Headlines

पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे लोकार्पण:पुण्यात मेट्रो येण्यासाठी मोदीजी पंतप्रधान होण्याची वाट पाहावी लागली- मुरलीधर मोहोळ




पुण्यातील बहुप्रतिक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे लोकार्पण आज पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुण्यात मेट्रो येणार, हे आपण गेली अनेक वर्षे ऐकत होतो; पण त्यासाठी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याची वाट आपल्याला बघावी लागली. पुण्याच्या मेट्रोमधून आतापर्यंत एका महिन्यात जवळपास 93 लाख नागरिकांनी प्रवास केला आहे. आता पुणेकर मेट्रोने 55 किलोमीटरचा प्रवास करू शकतात, तर आगामी काळात आणखी 46 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. यामुळे संपूर्ण शहराची कनेक्टिव्हिटी उत्तम होईल आणि वाढत्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मोठी सुटका होईल. ‘डबल इंजिन’ सरकारमुळे प्रगती- मोहोळ मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे आता आकाराने मुंबईपेक्षाही मोठे झाले आहे. यापूर्वी ज्यांनी पुण्याचे नेतृत्व केले, त्यांनी कधीच पुढच्या 25 वर्षांचा विचार केला नाही. मात्र, केंद्र सरकार असो वा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार, त्यांनी पुण्यासाठी अनेक विकासकामे सुरू केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेचा विचार केला असून, ‘डबल इंजिन’ सरकारमुळे आपली विविध क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे. मेट्रोचे संपूर्ण संचालन महिलांच्या हाती – सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सरकार आणि उद्योग जगभरातले घटक एकत्र आले तर काय घडू शकते, हे आज पुण्याने देशाला दाखवून दिले आहे. या मेट्रो मार्गावरील सर्व गाड्या 100 टक्के महिला चालवणार असून, स्थानकांवरील निम्मे कर्मचारीसुद्धा महिलाच असणार आहेत. मेट्रोचे यशस्वी संचलन करणाऱ्या या सर्व महिलांचे मी मनापासून कौतुक करते. अजित पवारांनी पाठपुरावा केला- सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पुणे मेट्रोचे जाळे आगामी काळात 100 किलोमीटरपेक्षाही अधिक लांब जाणार आहे. मेट्रोच्या डीपीआरसाठी दादा (अजित पवार) सतत पाठपुरावा करत होते. अर्थमंत्री म्हणून त्यांनी यासाठी भरीव निधीही उपलब्ध करून दिला. हा प्रकल्प कधीच होऊ शकणार नाही, असे अनेकांचे म्हणणे होते; परंतु अजित पवार यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच आज हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *