![]()
अंधानेर फाट्यावर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जनावरांची हाडे घेऊन जाणारा पिकअप (एमएच ४३ बीपी ३४८१) दुचाकीला वाचवताना उलटला. यात वाहनातील हाडे आणि मांसाचे अवशेष रस्त्यावर पसरल्याने दुर्गंधी पसरली होती. दरम्यान, अपघातात चालक जखमी असून, तिघ
.
अपघातात पिकअप मालक व चालक खलील खान हाजी इस्माईल खान (रा. मालेगाव) यांचा हात फ्रॅक्चर झाला, तर फिरोज खान मुख्तार खान (रा. कमलपुरा सर्व्ह नं. १५, मालेगाव) हे जखमी झाले. वाहनातील चार जणांपैकी पोलिसांनी फिरोज खान याला ताब्यात घेतले आहे. तर खलील खान, शहेजाद खान खलील खान आणि एक अज्ञात असे तिघे घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी संशयिताला कन्नड न्यायालयात हजर केले असता, पशु सहाय्यक आयुक्त डॉ. मिलिंद देशमुख यांनी हाडांचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक लॅबकडे पडताळणीसाठी पाठवले आहेत. वाहन जप्त करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार हाडांची विल्हेवाट लावण्यात आली. कन्नड शहर ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.