Headlines

भाजीपाला विकून घरी येताना अपघात; शेतकऱ्याचा मृत्यू:वसुसायगाव पुलाजवळ ट्रकची दुचाकीला धडक




गवळीशिवरा (ता. गंगापूर) येथील शेतकरी भाऊसाहेब लक्ष्मण केरे (५५) यांचा भाजीपाला विक्री करून गावाकडे परतत असताना रस्ते अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील वसुसायगाव ते खडकनारळा दरम्यानच्या पुलाजवळ ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब केरे हे सकाळी स्वतःच्या मोटारसायकलला जोडलेल्या साठ्यात भाजीपाला घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर परिसरातील मंडीत विक्रीसाठी गेले होते. भाजीपाला विकून घराकडे परतत असताना ट्रकने (एमएच ०४ सीयु ९९०६) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकला पोलिसांनी तातडीने पाठलाग करून करोडीजवळ ताब्यात घेतले. योगेश रंगनाथ केरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता गवळीशिवरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते ग्रामपंचायत सदस्य अंकुश भाऊसाहेब केरे यांचे वडील होत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, फौजदार गणेश काळे व सहाय्यक फौजदार धनंजय गोंडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातप्रवण क्षेत्र बनले धोकादायक, उपाययोजना करा ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो वसुसायगाव नजीकचा पूल ब्लॅक स्पॉट ठरत आहे. यापूर्वीही याच पुलाजवळ अनेक अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, फौजदार गणेश काळे व सहाय्यक फौजदार धनंजय गोंडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *