![]()
दिवाळीला पाच दिवस बाकी असताना मोर्शीच्या बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. आकाश कंदील आणि मातीचे दिवे खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. घरोघरी रंगरंगोटी, साफसफाई आणि दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू आहे. बाजारात कापडी आणि आकर्षक डिझाइनचे आकाश कंदील आहेत. हाताने रंगवलेले आणि कलाकुसर केलेले मातीचे दिवेही विक्रीसाठी ठेवले आहेत. प्लास्टिक आणि कृत्रिम वस्तूंपेक्षा काही नागरिक पर्यावरणपूरक आणि पारंपरिक वस्तूंना पसंती देत आहेत. या वस्तूंच्या विक्रीमुळे छोटे विक्रेते आणि कारागिरांना व्यवसाय मिळत आहे. दिवाळीसाठी मोतीचूरचा लाडू दिवा, सुतळी बॉम्ब दिवा, कमळ दिवा, जेली दिवा, साऊंड दिवा, कंदील दिवा, मोम मटका दिवा आणि सुगंधी दिवा बाजारात उपलब्ध आहेत. मातीपासून तयार केलेले विविध आकारांचे दिवेही विक्रीसाठी आहेत.
Source link
दिवाळीच्या खरेदीसाठी मोर्शीच्या बाजारात गर्दी:आकाश कंदील आणि मातीचे दिवे विक्रीसाठी दाखल; विविध आकारांचे दिवेही उपलब्ध