![]()
गणपती विसर्जन मिरवणुकीतील जुन्या वादातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात येवला रोडवरील एका हॉटेलसमोर शनिवारी दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली होती. यात गंभीर जखमी झालेला रोहित अनिल पठारे (२४) याचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झ
.
उर्वरित २५ संशयित मोकाट असल्याने मृताचे नातेवाईक संतप्त झाले होते. मंगळवारी मध्यरात्री नातेवाईकांनी वैजापूर पोलिस ठाण्याला घेराव घातला.
मयताच्या मित्राचा आत्मदहनाचा प्रयत्न
बुधवारी सकाळी रोहितच्या एका मित्राने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. यानंतर संतप्त जमावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या मांडून दीड तास रस्ता अडवून धरला. काही आंदोलक रस्त्यावर वाहनांसमोर झोपले, ज्यामुळे दुकाने बंद ठेवावी लागली आणि संभाजीनगर-नाशिक मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा आक्रोश सुरूच होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर अतिरिक्त पोलिस कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले.
हत्या, अपहरणासोबत ॲट्रॉसिटीचेही कलम
सुरुवातीला या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. रोहितच्या मृत्यूनंतर हत्या, अपहरण व ॲट्रॉसिटीची कलमे वाढवली. एकूण २६ आरोपींपैकी एकाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेची ३ व वैजापूर पोलिसांची २ अशी ५ पथके उर्वरित आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहेत. – भागवत फुंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैजापूर
पाय ठेचून, स्क्रू ड्रायव्हर खुपसून हत्या
संशयितांनी घरातून रोहितचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. रोहितचे पाय दगडाने ठेचून शरीरात स्क्रू ड्रायव्हर खुपसले. रक्तबंबाळ अवस्थेत तो पाणी मागत असतानाही त्याला अमानुष वागणूक दिल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. मध्यरात्रीपासून तणावपूर्ण परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी वेळेत पोहोचले नसल्याचीही बाब समोर आली आहे.