Headlines

मालाचा तुटवडा; कपडे 15% महागले:शासनाकडून अग्रिम मदत मिळाल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढणार




शहरातील कापड बाजारपेठेत सध्या खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. साड्या, ड्रेस मटेरियल, शर्टिंग-सुटिंग व महिलांच्या रेडिमेड कपड्यांसह लहान मुलांच्या फॅन्सी कपड्यांना मागणी आहे. आकर्षक डिझाइन, नवनवीन फॅशन आणि परवडणाऱ्या किंमती यामुळे रेडिमेड कपड्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कापड, रंग आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे कपड्यांच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. लहान मुलांचे टी-शर्ट १५० ते ३५०, शर्ट-पँट सेट ३०० ते ७००, जीन्स व टॉप ३५० ते ९००, पारंपरिक ड्रेस ४०० ते १,२०० रुपयांपर्यंत आहेत. पैठणच्या बाजारपेठेवर शेतकरी व नोकरदार वर्गाचा प्रभाव आहे. सणासुदीच्या काळात कुटुंबासाठी एकत्रित खरेदी करण्याचे प्रमाण वाढल्याने व्यापाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरत असल्याचे मत व्यापारी पवन लोहिया, कापड विक्रेते राम आहुजा यांनी सांगितले. विविध राज्यांतील कापडाची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. पैठणच्या कापड बाजारपेठेत सुरत आणि अहमदाबाद, महाराष्ट्रातील मुंबई, भिवंडी आणि इचलकरंजी, तसेच दक्षिण भारतातील तिरुपूर आणि बंगळुरू येथून व्यापारी मालाची खरेदी करतात. सुरत येथील साड्या, ड्रेस मटेरियल आणि फॅन्सी कपड्यांना मागणी असते. तर इचलकरंजीचे कॉटन कापड, भिवंडीचे ग्रे व प्रोसेस्ड फॅब्रिक आणि तिरुपूरचे टी-शर्ट, ट्रॅकपँट व मुलांचे रेडिमेड कपडे बाजारात उपलब्ध होत आहेत. सुरत, अहमदाबाद, मुंबईमधून बाजारामध्ये कपडे दाखल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *