Headlines

कारण अस्पष्ट:सिल्लोडला 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या, मूळ गावी दाभाडी येथे अंत्यसंस्कार




शहरातील माऊली नगर येथे एका २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयूर भाऊसाहेब जयवळ (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर हा अविवाहित होता आणि एका औषध कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होता. बुधवारी सकाळी माऊली नगर येथील राहत्या घरी त्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच मयूरचे मामा विष्णू जाधव यांनी त्याला तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयूरच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर बुधवारी सायंकाळी ४ वाजता भोकरदन तालुक्यातील त्याच्या मूळ गावी दाभाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अनंत जोशी करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *