![]()
या वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतींनी मोठी झेप घेतली होती. जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.८१ लाख रुपयांच्या आसपास पोहोचला होता. मात्र, सध्याच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत त्या उच्चांकापासून जवळपास ४३ हजार रुपयांची घट
.
अमेरिकन बँकांनी व्याजदर वाढवल्याचा परिणाम भारतीय सोने चांदी बाजारपेठेवर झाला आहे, अजूनही दर कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद आहे. शेतकऱ्याचे नगदी पीक हातचे गेल्याने तुलनेने बाजारपेठेत सध्या तरी फारसा उठाव नाही. परंतु दिवाळीमध्ये चांगली उलाढाल होईल, असा अंदाज आहे.
विनोद बुडूख, सराफ, बार्शी ग्राहकांकडून बजेटनुसार दागिन्यांची निवड केली जात असून, कमी वजनात आकर्षक डिझाइन मिळावे, अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करत आहे. दरम्यान, सोन्याच्या किमतीतील चढ-उतारामुळे सराफ व्यावसायिकांनाही बाजारपेठेच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे लागत आहे. ग्राहक खरेदी करताना सोन्याचा दर, घडणावळ, हॉलमार्क आणि दागिन्यांची शुद्धता याबाबत चौकशी करत आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर स्थिर राहिल्यास गर्दी वाढेल. विजय निलाखे|बार्शी दिवाळी सण आणि आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बार्शी शहरातील सराफ बाजारात ग्राहकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरू असल्याने सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून बाजारपेठेची माहिती घेतली जात आहे. दर कमी झाल्याने विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला असून, लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. दिवाळी हा सोने-चांदी खरेदीसाठी शुभ आहे.
दर कमी झाल्याने सोने खरेदीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनाच्या प्रमाणावर (क्वांटिटीवर) परिणाम होत आहे. ग्राहकांना सोने गुंतवणुकीसाठी हा दर अत्यंत योग्य आहे. -सुधीर अणवेकर, सराफ, बार्शी