Headlines

शंकरपट रद्द करुन शेतकऱ्यांना मदत:आ. प्रवीण तायडे यांनी केला मुख्यमंत्री सहायता निधीत धनादेश जमा




अचलपूर विधानसभा मतदारसंघात यंदा निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि हजारो शेतकरी बांधवांवर ओढवलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन दरवर्षी आयोजित करण्यात येणारा पारंपरिक शंकरपट यंदा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आ. प्रवीण तायडे यांनी घेतला. या आयोजनासाठी खर्च होणारी सात लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी ४ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ७ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. अचलपूर विधानसभा मतदारसंघात दरवर्षी शंकरपटाचे पारंपरिक आयोजन केले जाते. या माध्यमातून नागरिकांना मनोरंजनासोबत ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडते. मात्र, यंदा मतदारसंघातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करीत आहेत. त्यामुळे उत्सव साजरा करणे टाळण्यात आल्याचे आ. तायडे यांनी सांगितले. ^पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रवीण तायडे, आमदार, अचलपूर. आताच्याघडीला उत्सवापेक्षा मदतीचा हात देणे महत्त्वाचे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *