Headlines

दिवाळीत मिठाईतून जिभेवर विरघळणार 24 कॅरेट सोनं:अमरावतीत ‘स्वर्ण शंख” मिठाईचा नवा थाट, भाव 24 हजार रुपये किलो, सण-उत्सवात मागणी वाढली



दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमरावतीत सोन्याचा वर्ख असलेली मिठाई तयार करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रघुवीर प्रतिष्ठानने तयार केलेल्या या मिठाईला थेट २४ कॅरेट सोन्याचा वर्ख चढवलेला असून तिचा भाव तब्बल २४ हजार रुपये प्रतिकिलो एवढा आहे. ही विशेष

.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संचालक चंद्रकांतभाई पोपट म्हणाले, स्वर्ण शंख ही मिठाई चव आणि सौंदर्याचा अनोखा संगम असून ती राजस्थानच्या कुशल कारागिरांच्या हातून बनली आहे. या खास मिठाईमध्ये उच्च प्रतीचे मामरा बदाम, पिसोरी पिस्ता, शुद्ध केशर आणि २४ कॅरेट सोन्याचा वर्ख आहे. ही मिठाई रघुवीर प्रतिष्ठानच्या राजापेठ व दस्तुरनगर येथील दालनात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे प्रतिष्ठान दरवर्षी दिवाळीनिमित्त नवनवीन कल्पनांना जन्म देते. सोन्याचा वर्ख असलेली मिठाई ही या प्रतिष्ठानची खास ओळख असून कधी लाडू, कधी कतली, कधी मोदक तर कधी वडी अशा वेगवेगळ्या आकारात यापूर्वीही महागडी मिठाई तयार करण्यात आली आहे. यावेळी तेजस पोपट, वसंत ठक्कर, गोपाल पोपट, सुरेश वसानी, आकाश वसानी, रितेश बेलसरे आदी उपस्थित होते.

औषध प्रशासनाची मंजुरी देखील मिळवली या खास मिठाईवर चक्क २४ कॅरेट सोन्याचा वर्ख वापरण्यात आला असून, ती अत्यंत देखणी व राजेशाही दिसते. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) मंजुरीदेखील घेण्यात आली आहे. एफडीएच्या सर्व नियमांचे व मापदंडांचे पालन करून ही मिठाई तयार करण्यात आल्यामुळे ती चवदार असण्यासोबतच सुरक्षितही असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *