Headlines

दुष्काळ:सात धरणांपैकी महान, उमा प्रकल्पात कमी साठा तर हातोला तलाव कोरडा, धरणातील टेकड्यांसह पुरातन मंदिर, नदीचे पात्र पडले उघडे




यंदा अत्यल्प पाऊस, वाढती उष्णता. जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिस्थिती चिंताजनक झाली आहे. संपूर्ण अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्यबीज केंद्र, खांभोरा-उन्नई ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरील ६४ खेड्यांची तहान भागवणाऱ्या महान (काटेपूर्णा) धरणात दिवसेंदिवस बिकट स्थिती निर्माण झाली आहे. अकोला जिल्ह्यातील लहान-मोठ्या सात प्रमुख धरणांपैकी महान, उमा प्रकल्पांत सर्वात कमी जलसाठ्याची नोंद झाली आहे. तीन लघु सिंचन तलावांपैकी हातोला तलाव पूर्णपणे कोरडाठाक पडला आहे. गतवर्षी १ नोव्हेंबर रोजी महान धरणात १०० टक्के जलसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा धरणात केवळ १४.११ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पाणी शेकडो फूट दूर गेल्याने धरणाचा मागील पाणलोट परिसर पूर्णपणे उघडा पडला आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव परिसरातून येणाऱ्या मुख्य काटा कोंडला नदीचे कोरडे पडलेले पात्र आता स्पष्ट दिसत आहे. याशिवाय पुनर्वसन झालेली जुनी गावे, पुरातन गढी, मंदिरे, टेकड्या, श्री क्षेत्र वाघागड संस्थानवरील गंगा-मातेच्या मंदिरासमोरील भाग पाण्याबाहेर आला आहे. वन्यजीव विभागाने प्राण्यांसाठी तयार केलेल्या टेकड्याही उघड्या पडल्या आहेत. प्रकल्प तालुका जलपातळी (मी.) उपयुक्त साठा टक्केवारी काटेपूर्णा (महान) बार्शीटाकळी ३४०.११ १२.१८६ १३.०६ % उमा मध्यम प्रकल्प मूर्तिजापूर ३३७.७० ०.४३९ ३.७६% वाण प्रकल्प तेल्हारा ४०८.९६ ६८.०४ ८३.०२% मोर्णा प्रकल्प पातूर ३६४.२५ २५.६५ ६१.८६% दगड-पारवा प्रकल्प बार्शीटाकळी ३१५.६० ४.७५ ४६.६१% निर्गुणा प्रकल्प पातूर ३८७.५५ १५.१३ ५२.४४% पोपटखेड प्रकल्प अकोट ९८.६७ १७.११ ९४.९९% महान धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता इतर सर्व कामांसाठीचे पाणी बंद करण्यात आले आहे. संपूर्ण साठा अकोला शहरासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. महान केंद्रावरून अकोल्याला नियमित पाणी उपसा सुरू आहे. तरी शहरात विविध भागांत १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महान पाटबंधारे विभागाने केले आहे. कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार, शाखा अभियंता संदीप नेमाडे, वैभव उगले व मनोज पाठक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 2005- 06 च्या पुनरावृत्तीची भीती महान धरणात केवळ १३.०६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी यावेळी धरणात ९९.४५ टक्के जलसाठा होता. त्यामुळे अकोल्यात १२ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणात ५ व्हॉल्व्ह बसवले आहेत. त्यापैकी दोन व्हॉल्व्ह आधीच पाण्यावर उघडे पडले आहे. आता तिसरा व्हॉल्व्हची उघडा पडण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी २००५-०६ मध्ये तिसरा व्हॉल्व्ह उघडा पडल्याने जिवंत जलसाठा संपला होता. जिल्ह्यातील सात प्रमुख प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठा तलावांची स्थिती झोडगा (महान) : पाणीपातळी ९५.२० मीटर, उपयुक्त साठा ०.२१८७ दलघमी, १३.५८%. शहापूर : पाणीपातळी ९६.२० मीटर, उपयुक्त साठा १.५५०४ दलघमी, ४९.७५%. हातोला (महान) : उपयुक्त साठा निरंक, शून्य टक्के.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *