![]()
थंडीची चाहूल लागताच उत्तरेकडील हिमालयातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध दुर्मीळ पक्षी अकोल्यात दाखल होऊ लागले आहेत. अकोल्याच्या शेतशिवारात व विरळ जंगलांत नुकतेच हिमालयातील दोन देखणे व अत्यंत चपळ पक्षी दाखल झाले आहेत. यामध्ये गडद निळ्या रंगाचा ‘अल्ट्रामरीन फ्लायकॅचर’ (नीलसागर) आणि पिवळ्या पोटाचा ‘ग्रे-हेडेड कॅनरी’ (राखाडी डोक्याचा माशीमार) यांचा समावेश आहे. पक्षी निरीक्षक अतुल मनवर, अजित गुडे, सुभाष पडघान यांनी या देखण्या पाहुण्यांची अकोला परिसरात नोंद घेतली आहे. हा पक्षी अत्यंत फांदीवर दबा धरून बसतो. कीटक दिसताच हवेत क्षणात झेप घेऊन त्याला पकडतो. पक्षिशास्त्रात या शिकारीच्या पद्धतीला ‘सॅलियिंग’ म्हणतात. अकोल्यात हा नदीकाठची झाडी, शेताच्या कडेला असलेली बाभळीची झाडे, बागांमधील खालच्या फांद्यांवर आढळतो. सुभाष पडघन, पक्षी अभ्यासक नीलसागर: चपळ शिकारी १० सेमी आकाराचा, जाडसर बांधा व लहान चोच असलेला अल्ट्रामरीन फ्लायकॅचर हा मूळचा हिमालयीन पक्षी आहे. थंडी सुरू होताच सप्टेंबर- ऑक्टोबरमध्य े तो दक्षिणेकडे स्थलांतर करतो. दिल्ली, उत्तर महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश ते थेट केरळपर्यंत प्रवास होतो. हवामान, जंगलतोडीने अधिवासाला धोका हवामान बदल व हिमालयातील जंगलतोडीमुळे या दोन्ही पक्ष्यांच्या मूळ अधिवासाला धोका निर्माण होत आहे. तसेच मैदानी भागातही जुन्या व मोठ्या वृक्षांची तोड झाल्यास हे पक्षी तत्काळ परिसर सोडून जातात. दोन्ही पक्ष्यांची वैशिष्ट्ये एका दृष्टिक्षेपात अल्ट्रामरीन फ्लायकॅचर : नर पक्ष्याची पाठ, डोके व शेपटी चमकदार गडद नीलसागर रंगाची असते. पोट व भुवई पांढरीशुभ्र असते. मादी फिकट राखाडी-तपकिरी रंगाची असते. ग्रे-हेडेड कॅनरी : चमकदार पिवळे पोट, राखाडी डोके, सतत चंचल हालचाली, पानांच्या फटीत उलटे लटकून भक्ष्य पकडण्याची अनोखी लकब.
Source link
हिमालयातून पाहुणचाराला आले देखणे पक्षी:नीलसागर अन् राखाडी डोक्याच्या ‘ग्रे हेडेड कॅनरी’चे झाले आगमन