![]()
तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतीसोबतच पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी तालुका प्रशासनाने ‘खेत बचाव अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. रवाळा येथे कृषी विभाग व आत्मा यांच्या
.
या वेळी उपविभागीय अधिकारी सौरभ गावंडे, तहसीलदार रामदास शेळके, तालुका कृषी अधिकारी रेहान मुजावर, मंडळ कृषी अधिकारी मनीष भागवत, सहाय्यक कृषी अधिकारी मनोज भाकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत श्रीराव, हेमंत बरांगे तसेच शेतकरी उपस्थित होते. वरूड तालुका संत्रा आणि मोसंबी उत्पादनासाठी ओळखला जातो. येथील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न या फळपिकांवर अवलंबून आहे. मात्र, दुष्काळामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून आगामी काळात जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच चारा लागवडीचे नियोजन सुरू केले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी सौरभ गावंडे यांनी दुष्काळाच्या काळात शेतीसोबत पशुधनाचे संरक्षण करणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. चारा टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच चारा पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी उपलब्ध जमिनीचा काही भाग चारा उत्पादनासाठी वापरावा, असे आवाहन त्यांनी केले. तहसीलदार रामदास शेळके यांनीही प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील काही क्षेत्र चारा पिकांसाठी राखून ठेवण्याची गरज व्यक्त केली. कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने चारा टंचाई टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.‘खेत बचाव अभियान’अंतर्गत प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. पर्यायी पिकांचे नियोजन, उपलब्ध साधनांचा योग्य वापर आणि जनावरांसाठी चारा उत्पादन यावर भर दिला जात आहे. रवाळा येथील ज्वारी पेरणीच्या उपक्रमातून दुष्काळी परिस्थितीत चारा उपलब्धतेसाठी आधीपासून तयारी करण्याचा संदेश देण्यात आला. यामध्ये गावातील ‘पर्यावरण समतोल शेतकरी बचत गटा’च्या सदस्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. केवळ बियाणे वाटपावरच न थांबता, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतात प्रत्यक्ष ज्वारीची पेरणी करून या अभियानाचा व चारा लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी सौरभ गावंडे म्हणाले, “दुष्काळ किंवा टंचाईच्या काळात केवळ पिकांची काळजी घेऊन चालणार नाही, तर शेतीचा मुख्य कणा असलेल्या पशुधनाचे संरक्षण करणेही तितकेच गरजेचे आहे. चारा टंचाईची तीव्रता वाढल्यानंतर उपाययोजना शोधण्यापेक्षा, शेतकऱ्यांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांची लागवड केली पाहिजे.