Headlines

शिक्षण क्षेत्राच्या आव्हानांना सामोरे जाणारे शिक्षकच घडवणे गरजेचे:श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती



बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे शिक्षकांसमोर नवनवीन आव्हाने निर्माण होत आहेत. ही आव्हाने समजून घेऊन जबाबदारीने काम करणारा शिक्षक घडवणे ही काळाची गरज आहे, असे मत प्राचार्य डॉ. जी. एन. जाधव यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात सत्र २०२६-२८ मध्

.

कार्यक्रमाचे उद्घाटन एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूरचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. जी. एन. जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय राऊत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख, प्रा. डॉ. किशोर क्षत्रिय, प्रा. डॉ. अंजली ठाकरे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना शिक्षक म्हणून काम करताना आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांची माहिती देण्यात आली. शिक्षणाधिकारी डॉ. सय्यद राजोकी यांनी ‘नियुक्ती ते निवृत्ती : कर्तव्य व जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षकांनी सेवेत प्रामाणिकपणा, नैतिकता यांना महत्त्व देऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी सांगितले. प्रा. पंकज निर्मळ यांनी स्पर्धा परीक्षांमधील यश-अपयश, तयारीचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. सुचित कुंभारकर यांनी टीईटी, टेट, सीटीईटी यांसारख्या परीक्षांची माहिती दिली. मयूर चौधरी यांनी शाळा व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या, कौशल्ये समजावून सांगितली. डॉ. प्रज्ञा चौधरी यांनी मानसिक व शारीरिक आरोग्याचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका अर्चना लुंगे, मुख्याध्यापक संदीप इंगोले यांनी आंतरवासीयता उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष शाळेत काम करताना अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *