Headlines

ही जनादेशातील भेसळ, शेतकरी कधीच विसरत नसतो:गोकुळ दूध संघावरून राहुल गांधींचा भाजपवर घणाघात




कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचा आणि अर्थकारणाचा कणा असलेल्या ‘गोकुळ दूध संघा’च्या अध्यक्ष निवडीचा आणि राज्य सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा आता थेट दिल्लीत पोहोचला आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर ‘जनादेशातील भेसळ’ आणि ‘मतांची चोरी’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे? राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले: नेमके प्रकरण काय आहे? कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले आणि विरोधकांना धक्का दिला. मात्र, लोकशाही मार्गाने सतेज पाटील गटाला बहुमत मिळालेले असताना, राज्य सरकारने (महायुती) सहकार कायद्यातील तरतुदींचा आधार घेत किंवा नवे नियम आणून गोकुळ दूध संघात ४ ‘तज्ज्ञ (शासकीय) संचालक’ नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे संचालक मंडळाची संख्या वाढेल आणि सतेज पाटील गटाचे बहुमत अल्पमतात जाऊन सत्ताधाऱ्यांना गोकुळवर नियंत्रण मिळवता येईल, असा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा आरोप आहे. निकालाच्या दिवशी कोल्हापुरातून आलेला जनमताचा कौल राज्य सरकार प्रशासकीय ताकदीच्या जोरावर बदलू पाहत आहे, असा आरोप करत संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार आणि आता थेट राहुल गांधी यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ——————- हेही वाचा.. मिरवणूक काढता आली नाही म्हणून ईगो दुखावला का?:गोकुळ दूध संघावरून रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले- ही तर विनाशकाले विपरीत बुद्धी!
कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने या निवडणुकीत बहुमत मिळवले असताना, राज्य सरकारकडून तज्ज्ञ (शासकीय) सदस्यांची नियुक्ती करून गोकुळवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या हस्तक्षेपाला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणत, सतेज पाटील यांना भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *