Headlines

Hasan Mushrif Slams Rahul Gandhi Over Gokul Milk Union Controversy


कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला आता महायुती सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राह

.

‘राहुल गांधींना विषय समजलेला नाही’

राहुल गांधींच्या ‘जनादेशातील भेसळ आणि मतांची चोरी’ या आरोपावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “राहुल गांधींनी जे ट्विट केले आहे, त्यांना हा विषय अजिबात समजलेला नाही. इतर पक्षांनी जशी मते चोरली, तसाच हा प्रकार असल्याचे त्यांना वाटते, पण वास्तविक तसे नाही. हा केवळ गैरसमजातून केलेला आरोप आहे.”

‘सतेज पाटील सोशल मीडियात हुशार, आम्ही भोळी माणसं’

स्थानिक दूध संघाचा विषय राष्ट्रीय पातळीवर कसा पोहोचला? या प्रश्नावर बोलताना मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. “फक्त सोशल मीडियाचा वापर करून, पेड आणि फेक अकाऊंट्स काढून राबवलेल्या प्रचार यंत्रणेमुळे हा संघ इतक्या मोठ्या प्रसिद्धीला आला आहे. सतेज पाटील या सोशल मीडियाच्या खेळात फार तयार आहेत आणि आम्ही फार भोळी-भाबडी माणसं आहोत,” असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

नेमका ‘डेडलॉक’ (पेचप्रसंग) काय आहे?

शासनाच्या हस्तक्षेपाचे समर्थन करताना मुश्रीफ यांनी गोकुळच्या पोटनियमांकडे लक्ष वेधले. “निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला. काँग्रेसला १३ आणि महायुतीला १२ जागा मिळाल्या. पण संस्थेच्या नियमानुसार अध्यक्षाच्या निवडीसाठी १४ संचालकांचा ‘कोरम’ पूर्ण होणे बंधनकारक आहे. एका बैठकीत १२ सदस्य गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. दोन-तीन बैठका तहकूब झाल्या तर तिथे प्रशासक नेमावा लागतो आणि पुन्हा निवडणूक घ्यावी लागते. हा ‘डेडलॉक’ कुठल्याही इतर सहकारी संस्थेत नाही, तो फक्त गोकुळमध्ये आहे.”

‘प्रशासक टाळण्यासाठीच सरकारचा निर्णय’

मुश्रीफ पुढे म्हणाले, “जर २५ लोकांच्या हातातच कारभार ठेवायचा असेल, तर हा डेडलॉक फक्त सरकार दूर करू शकत होते. ज्या संस्थांची उलाढाल ५०० कोटींपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना शासकीय अनुदान, जमीन आहे, तिथेच हा कायदा लागू होतो. सरकारने निवडून आलेल्या लोकांच्या हातात सत्ता राहावी आणि ५.५ लाख दूध उत्पादकांना न्याय मिळावा, यासाठी ही कारवाई केली आहे.”

सतेज पाटलांना थेट आव्हान आणि तज्ज्ञ संचालकांवर स्पष्टीकरण

सतेज पाटलांच्या आरोपांना उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, “आम्ही त्यांना कुठे अडवले आहे? त्यांचे बहुमत आहे ना? मग त्यांनी कोरम पूर्ण करावा आणि चेअरमन निवडावा. पण त्यांना ते शक्य झालेले नाही. तसेच, जे तज्ज्ञ संचालक नेमले जातील, त्यात माझा मुलगा किंवा इतर कोणताही राजकीय कार्यकर्ता नसेल. ज्यांचा कोणत्याही पक्षाशी दुरान्वये संबंध नसेल, अशा खऱ्या तज्ज्ञांचीच नेमणूक सरकार करेल.”

‘न्यायालयाचा निर्णय मान्य असेल’

हे प्रकरण न्यायालयात जाण्याच्या शक्यतेवर मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, “हे प्रकरण न्यायालयात जाऊ शकते. न्यायालय जो काही निर्णय घेईल, त्याचा आदर आम्ही करू. पण शासनाची भूमिका केवळ पेचप्रसंग संपवण्याची आहे.”

—————

हेही वाचा..

ही जनादेशातील भेसळ, शेतकरी कधीच विसरत नसतो: गोकुळ दूध संघावरून राहुल गांधींचा भाजपवर घणाघात

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचा आणि अर्थकारणाचा कणा असलेल्या ‘गोकुळ दूध संघा’च्या अध्यक्ष निवडीचा आणि राज्य सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा आता थेट दिल्लीत पोहोचला आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर ‘जनादेशातील भेसळ’ आणि ‘मतांची चोरी’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.