विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चरबी उतरवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तर जनतेने तुम्हाला भोपळा देत तुमची उरलीसुरली चरबीसुद्धा उतरवली आहे. मग तुम्ही कसल्या चरबीच्या गप्
.
नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्राचे बहुमत देवाभाऊंच्या सोबतीला असून जनतेने तुम्हाला वेळोवेळी नाकारले आहे, तुम्ही त्याचे आत्मचिंतन केले पाहिजे. देवाभाऊ ‘लायक’ आहेत की ‘नायक’ आहेत, याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेने वेळोवेळी दिले आहे. देवेंद्र फडणवीस लायक आहेत म्हणूनच त्यांना 2014 मध्ये मुख्यमंत्री केले, 2019 मध्ये बहुमत दिले आणि 2024 मध्येही प्रचंड बहुमत दिले. ते लायक आहेत म्हणूनच आज नायक म्हणून काम करत आहेत.
काँग्रेस आणि शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही
नवनाथ बन पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याउलट, भाजपने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5000 रुपयांची अग्रिम मदत केली, तर काँग्रेसने केवळ अडीच हजार रुपये दिले आणि तेसुद्धा अंतिम मदत म्हणून दिले. महाराष्ट्रातील संस्थांमध्ये मराठी माणसेच काम करतील आणि मराठी माणसांच्या नेतृत्वातच ‘गोकुळ’ चालेल. संजय राऊतांनी ‘जिलेबी-फापडा आणि उद्धव ठाकरे आपडा’ व ‘केम छो वरळी’ असे बॅनर गुजरातमध्ये का लावले होते, याचे उत्तर आधी उबाठाने दिले पाहिजे.

..तर राहुल गांधींवर ट्विट करण्याची वेळच आली नसती
नवनाथ बन म्हणाले की, 2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला पूर्ण बहुमत दिले होते आणि काँग्रेसला विरोधात बसवले होते. केवळ 40-42 जागा मिळवणाऱ्या राहुल गांधींच्या पक्षाने 2019 मध्ये सत्ता हस्तगत केली, त्यावेळी हे बहुमत कोणी चोरी केले याचे उत्तर राहुल गांधींनी जनतेला दिले पाहिजे. ज्यांना बहुमत मिळाले त्यांची सत्ता 2019 मध्ये महाराष्ट्रात यायला हवी होती, पण त्यावेळी राहुल गांधींच्या पक्षाने खुर्चीसाठी शिवसेनेसोबत अभद्र युती केली. हा राहुल गांधींचा इतिहास आहे; त्यांनी गोकुळसारख्या छोट्या निवडणुकीचा दाखला देण्यापेक्षा 2019 साली महाराष्ट्रात काय झाले याचा दाखला जनतेला दिला पाहिजे. त्यावेळी बहुमत चोरण्याचे काम संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधींनी एकदा आरशात पाहिले असते, तर त्यांच्यावर ट्विट करण्याची वेळच आली नसती.
काँग्रेसकडून देशावर आणीबाणी लादण्याचे काम
नवनाथ बन म्हणाले की, न्यायालयाने इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवली होती, त्यावेळी देशावर आणीबाणी लादण्याचे काम गांधींनी केले, हा काँग्रेसचा खरा इतिहास आहे. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी ज्यांनी देशात आणीबाणी लावली आणि विरोधकांना दोन-दोन वर्षे तुरुंगात डांबले, त्या काळात लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह एकाही विरोधी नेत्याला त्यांनी सोडले नाही; सर्वांना कारागृहात टाकले. 2019 मध्ये जनतेने विरोधात बसवलेले असताना सत्तेसाठी शिवसेनेसोबत जाणारे राहुल गांधी आज गोकुळबद्दल प्रश्न विचारत आहेत; पण त्यांनी स्वतःचा इतिहास पाहिला तर त्यांना योग्य उत्तर आपोआप मिळेल.
हे ही वृत्त वाचा
भाजपला आलेली चरबी जनता उतरवेल:गुजरात लॉबीला गोकुळ विकण्याचा डाव; ही शेतकर्यांशी बेईमानी- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला मस्ती आली असून, लोकशाही न मानण्याची त्यांची भूमिका आहे. ज्या गोकुळच्या निवडणुकीत समविचारी पॅनलला बहुमत मिळाले, त्यांना डावलून पराभूत झालेल्यांच्या हातात पुन्हा गोकुळ द्यायचे आणि ते गुजरात लॉबीला विकायचे, हा सर्व डाव जर देवेंद्र फडणवीस करत असतील, तर ते महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांशी बेईमानी करत आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
भाजपकडून दूध उत्पादकांची Vote चोरी:’गोकुळ’मधील हस्तक्षेपावरून राहुल गांधीचा आरोप; म्हणाले- जनादेशातील भेसळ शेतकरी कधीच विसरणार नाही!

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचा आणि अर्थकारणाचा कणा असलेल्या ‘गोकुळ दूध संघा’च्या अध्यक्ष निवडीचा आणि राज्य सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा आता थेट दिल्लीत पोहोचला आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर ‘जनादेशातील भेसळ’ आणि ‘मतांची चोरी’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वाचा सविस्तर