![]()
पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा स्पर्धा झाली. भारतासह दुबई, पाकिस्तान, यूके आणि यूएसएतील 1,600 हून अधिक स्पर्धकांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने भाग घेतला.‘स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स’ने ‘क्रेस्ट सीटीएफ 2.0-2026’ ही स्पर्धा ‘हॅक टुडे अ सेफर टुमारो’ या संकल्पनेवर आयोजित केली होती. विद्यापीठ पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील परिसरात आहे. क्विक हील आणि सिक्रीट लॅबचे वरिष्ठ संचालक जसविंदर सिंह म्हणाले की, सायबर सुरक्षेतील वाढते धोके आणि त्यावरील उपायांबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून त्याची अंमलबजावणीही महत्त्वाची आहे.पीसीयूच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचे प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने शिकण्याचे आणि कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. नैतिक हॅकिंगच्या माध्यमातून डिजिटल जगाच्या संरक्षणासाठी योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य अजिंक्य काळभोर आणि नरेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली. कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांचेही मार्गदर्शन लाभले. यावेळी कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, संरक्षण प्रकल्पांचे तज्ज्ञ लेफ्टनंट कमांडर विवेक कामत, सायबर सिक्युअर्ड इंडियाचे संस्थापक निखिल महादेश्वर, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, परीक्षा नियंत्रक डॉ. अंजू बाला आणि अमित पाटील उपस्थित होते. शैक्षणिक विभागाचे अधिष्ठाता डॉ. सचिन पवार, आयक्यूएसएसचे अध्यक्ष डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा, हायरॉशील्डचे संस्थापक प्रियांशु कुक्कर, हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीच्या संचालक शिफा सायकलवाला आणि संस्थापक संचालक रोहित गौतमही उपस्थित होते.
Source link
पीसीयूमध्ये रंगली आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा स्पर्धा:5 देशांतील 1600 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग, केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे, प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची- जसविंदर सिंह