Headlines

पानमंदवाडीच्या सौर प्रकल्पामुळे 2,504 शेतकऱ्यांना दिवसा वीज:5 मेगावॅट प्रकल्पाचे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण, शेतीला मोठा दिलासा




पानमंदवाडीतील ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण झाले. या प्रकल्पातूनकडून वीज उपकेंद्रांतर्गत २५०४ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील पानमंदवाडी येथे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, दिवसा वीज, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतमालासाठी योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे. या बाबींवर शासन काम करत आहे, असे पवार यांनी सांगितले. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असेही त्यांनी सुनेत्रा पवार म्हणाल्या. शेतीच्या विकासासाठी पाणी उपलब्ध असण्यासोबत दिवसा, पुरेशा दाबाने वीज मिळणेही जरूरीचे आहे. महाराष्ट्र राज्य सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यभर विकेंद्रित पद्धतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. दिवसा वीज मिळाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करणे सोपे होईल. रात्री शेतात जाण्याची गरज कमी झाल्याने बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्यांपासून सुरक्षिततेस मदत होईल, असे पवार म्हणाल्या. अवाडा कंपनीने उभारलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे २० कोटी ७५ लाख रुपये खर्च आला. प्रकल्पातील वीज ५.८ किलोमीटर लांबीच्या ११ केव्ही वाहिनीद्वारे ३३ केव्ही कडूस उपकेंद्रापर्यंत आणली आहे. स्थानिक पातळीवर तयार होणारी ही वीज शेतीपंपांसाठी वापरली जाणार आहे. कडूस उपकेंद्रांतर्गत एकूण ८ हजार ६४३ वीजग्राहक आहेत. त्यात २५०४ कृषी ग्राहकांचा समावेश आहे. वाढत्या विजेच्या मागणीसाठी उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त उच्चदाब रोहित्र बसवण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर उपकेंद्राची क्षमता १५ एमव्हीए होईल. कार्यक्रमाला आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील आणि चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनिषा गोरे उपस्थित होत्या. महावितरणचे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम आणि कार्यकारी अभियंता केशव काळुमाळीही उपस्थित होते. अवाडाचे फतेह सिंग आणि मुर्तुजा काझी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. ———– हेही वाचा.. ही सरळ सरळ हुकूमशाही: हक्कासाठी जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल, ऊस आंदोलन आणि गोकुळवरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर घणाघात

ऊस आंदोलन आणि कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये सुरू असलेल्या राजकीय हस्तक्षेपावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “सध्या राज्यात जे काही सुरू आहे, ती सरळ सरळ हुकूमशाही आणि दादागिरी आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय हे सरकार कोणालाही दाद देणार नाही,” असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *