Headlines

अमरावतीच्या वेद सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी योगेश जोशी:गौरव दशसहस्त्र सचिव; कोजागिरी उत्सवाच्या आमसभेत कार्यकारिणी जाहीर




अमरावतीच्या श्री वेद सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी योगेश सुधाकर जोशी, तर सचिवपदी गौरव गजानन दशसहस्त्र यांची निवड झाली. कोजागिरी उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या आमसभेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. शहरातील वैदिक पुरोहितांच्या पुढाकारातून स्थापन झालेली ही संस्था वेदांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी काम करते. वेदांमधील ज्ञान, विचार आणि तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला वैदिक परंपरेची ओळख करून देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. वेदांमध्ये जीवनमूल्ये, संस्कार आणि मानवी जीवनाला दिशा देणारे विचार आहेत. त्यांचा समाजात प्रसार व्हावा, यासाठी प्रतिष्ठान धार्मिक, सांस्कृतिक आणि वैदिक उपक्रम आयोजित करते. संस्थेच्या वार्षिक नियोजनात कोजागिरी उत्सवाला विशेष स्थान आहे. आमसभेत संस्थेच्या आगामी कामाचे आणि उपक्रमांचे नियोजन तसेच वेदसेवेचा विस्तार यावर चर्चा झाली. त्यानंतर नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनोद जोशी, सहसचिवपदी समीर जोशी आणि कोषाध्यक्षपदी प्रवीण जोशी यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून आकाश कुलकर्णी, मुकुंद फाटक, मंदार जहागीरदार, चंद्रशेखर तांबेकर, श्रीपाद सत्रे आणि माधव कवीश्वर यांचा समावेश आहे. उपस्थित सभासदांनी नवनियुक्त अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून संस्थेचे काम आणि वैदिक ज्ञानाचा प्रसार वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *