Headlines

Sanjay Shirsat Accuses Imtiaz Jalil In Nida Khan Conversion Case


निदा खान हिला नाशिकमधून पळवून मुंब्रा येथे घेऊन जाणे, तेथून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणे आणि जवळपास 35 दिवस तिच्यासह तिच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था करण्यामागे मुख्य आरोपी इम्तियाज जलील हेच आहेत. त्यांचा जो नगरसेवक आहे, तो केवळ एक मोहरा असून हे

.

संजय शिरसाट म्हणाले की, धर्मांतर करण्यासाठी नाशिक, पुणे, नागपूर, संभाजीनगरसह कोकणातील काही भागांत टोळ्या कार्यरत असून मोठे षडयंत्र रचले जात आहे. राज्य सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले असून पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

जलील यांच्याच आदेशानुसार संवाद

संजय शिरसाट म्हणाले की, इम्तियाज जलील यांच्या कॉल रेकॉर्डमधील त्यांच्या आवाजाचे नमुने पूर्णपणे मॅच होत आहेत. निदा खान ही तिची आई, मावशी आणि वडिलांसह छत्रपती संभाजीनगरमध्ये 35 दिवस राहून होती. तिच्याशी रोज केला जाणारा संवाद हा जलील यांच्याच आदेशानुसार होत होता, त्यामुळे त्यांच्या आवाजाचे नमुने तपासले जातील.

पोलिसांनी चांगले काम केले

या तपासाबद्दल पोलिस आयुक्तांचे अभिनंदन करताना शिरसाट म्हणाले, पोलिस आयुक्तांनी अतिशय उत्तम काम केले आहे. या प्रकरणी इम्तियाज जलील यांच्यासह मतीन पटेल यांना अटक करावीच लागेल आणि ते लवकरच तुरुंगात दिसतील. हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे; त्या मुलीचा झालेला छळ आणि तिच्यावर केलेले प्रयोग ही काही छोटी घटना नाही. आता या प्रकरणात अतिशय जलद गतीने कायदेशीर कारवाई होईल.

नेमके प्रकरण काय?

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप

नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नाशिकमधील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळासह धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक आरोपींची नावे समोर आली असून निदा खान ही प्रमुख आरोपींपैकी एक आहे. निदा खानला आश्रय देण्यात आल्याच्या प्रकरणाचा तपास करताना आता इम्तियाज जलील यांचे नाव पुढे आले आहे. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *