Headlines

गोकुळमध्ये रडीचा डाव अन् बाहेर लोकशाही वाचवा मोर्चे:सत्तेत राहून मोर्चे काढणारा भाजप अजब पक्ष, राज ठाकरेंचा घणाघात




कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीतील राज्य सरकारच्या हस्तक्षेपावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत सडकून टीका केली आहे. “खालपासून वरपर्यंत सत्तेत असूनही ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चे काढणारा भाजप हा जगातील एक अजब पक्ष आहे,” असा टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी गोकुळमधील भाजपच्या ‘रडीच्या डावा’चे वाभाडे काढले आहेत. ‘गोकुळमध्ये ५ शासकीय संचालक नेमून काय सिद्ध करताय?’ गोकुळ दूध संघात सतेज पाटील यांच्या पॅनेलला मिळालेल्या बहुमताचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी भाजपच्या ‘लोकशाही वाचवा’ भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल, तर गोकुळ प्रकरणात सतेज पाटील पॅनेलचे १३ जण आणि तुमच्या भाजप पॅनेलचे १२ जण निवडून आल्यावर, लगेच तुम्ही सरकारचे ५ संचालक का नेमले? त्यांना मतदानाचा अधिकार देऊन तुम्ही काय सिद्ध करताय? सतेज पाटील यांच्या पॅनेलचे संचालक बॅलेट पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा असती, तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता.” ‘भाजपमध्ये समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ’ राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाजपला चिमटा काढत म्हटले की, “गोकुळवर सत्ता मिळवता आली नाही, म्हणून तुम्ही तुमची सगळी तत्त्वे बाजूला ठेवणार आणि ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे आणि त्याचवेळी भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचाही भीषण दुष्काळ आहे. हे दोन्ही दुष्काळ एकाच वेळी कसे यावेत, याचेच आश्चर्य वाटते!” ‘स्वतःच लोकशाहीचा गळा आवळणार आणि…’ राज ठाकरे म्हणाले, “हे सत्तेत असतानाच ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा-सुव्यवस्था बिघडली, तरी ‘दहशतवादापासून देश वाचवा’ यासाठी हेच मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे, म्हणून आता ‘अर्थव्यवस्था वाचवा’ यासाठी पण हेच मोर्चे काढतील.” ‘भाजपने आता रडीचा डाव बंद करावा आणि सहन करायला शिकावे’ राज ठाकरे यांनी शेवटी भाजपला सडेतोड सल्ला दिला. “भारतीय जनता पक्षाने हा रडीचा डाव खेळणे आता बंद करावे. तुम्ही कुठल्या का मार्गाने असेना, जे बहुमत मिळवले ते सर्व विरोधी पक्षांनी गेली १२ वर्षे सहन केले. मग आता या देशातील जनता जेव्हा विरोधी पक्षांकडे झुकायला लागली आहे, तेव्हा त्यापुढे भाजपाने पण हे सर्व सहन करायला शिकले पाहिजे,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. —————— हेही वाचा.. महाराष्ट्रातील अनोख्या दिवाळी परंपरा:कुठे वाघदेवाची पूजा, कुठे मेंढ्यांचा शृंगार; तर कुठे अंगणात उभे राहतात शिवरायांचे गड-किल्ले
दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते आकाशकंदील, पणत्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज, फराळाचा सुगंध आणि लक्ष्मीपूजनाचा उत्साह. मात्र, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिवाळीचे आणखीही काही वेगळे रंग पाहायला मिळतात. कुठे आदिवासी बांधव वाघदेवाची पूजा करून पशुधनाच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात, कुठे नरकासुराच्या प्रतिकृतीचे दहन केले जाते. कुठे शेतकरी बळीराजाला साकडे घालतात, तर कुठे धनगर बांधव आपल्या मेंढरांनाच लक्ष्मी मानून त्यांची पूजा करतात. एवढंच नाही, तर दिवाळीत मुलांच्या हातून साकारले जाणारे मातीचे गड-किल्ले महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतात. जाणून घेऊया महाराष्ट्राच्या दिवाळीतील अशाच पाच अनोख्या आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या परंपरा… सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *