Headlines

दातृत्वाच्या पणत्यांनी उजळली पालवीतील दिवाळी:सन्मती सेवा दलाकडून 3 लाखांचे किराणा साहित्य दान; देश-विदेशातील जैन बांधवांचा पुढाकार



पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी प्रकल्पातील निराधार बालके आणि महिलांची दिवाळी आनंददायी व्हावी, या उद्देशाने श्री सन्मती सेवा दलाने सुमारे ३ लाख रुपये किमतीचे किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे दान केले. विशेष म्हणजे, या सेवाकार्यासाठी

.

पंढरपूर येथे प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंचित व निराधार बालके तसेच महिलांसाठी पालवी प्रकल्प चालवण्यात येतो. या प्रकल्पातील लाभार्थ्यांची दिवाळी गोड व्हावी, या भावनेतून सन्मती सेवा दलाच्या वतीने मागील सहा वर्षांपासून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मदतीचा उपक्रम राबवला जात आहे. पहिल्या वर्षी अवघ्या २५ हजार रुपयांच्या मदतीने सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार यंदा तीन लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बुधवारी (दि. ४) हे साहित्य पालवी परिवाराकडे सुपूर्द करण्यात आले.

सोलापूर, अकलूज, मुंबई, मुरूड, पुणे, डोंबिवली, फलटण, इंदापूर, अहिल्यानगर, कपिलापुरी, दौंड, टेंभुर्णी, पंढरपूर आणि भीमानगर यांसह विविध ठिकाणच्या ४१ दिगंबर जैन दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घेतला. साहित्य सुपूर्दप्रसंगी सन्मती सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष तेजस गांधी, योगेश गांधी, संदीप शहा, आर. के. दोशी, प्रज्योत गांधी, रोहित चंकेश्वरा, योगराज गांधी, रत्नकुमार फडे, नमन गांधी, महावीर भालेराव, बाहुबली पुरवत, किरण पुरवत आदी उपस्थित होते.

न्यूयॉर्कमधूनही माणुसकीचा मदतीचा हात या सेवाकार्यात देशातील विविध शहरांतील जैन बांधवांसोबतच परदेशातील भगिनींनीही सामाजिक बांधिलकी जपली. न्यूयॉर्क येथील जैन भगिनींनी २२ हजार रुपयांचे योगदान देत पालवी प्रकल्पातील बालके व महिलांच्या दिवाळीत आनंदाची भर घातली. भौगोलिक अंतरापलीकडे जपलेल्या माणुसकीच्या नात्याचे हे उदाहरण ठरले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *