![]()
ठाणे पश्चिम येथील लुईसवाडी परिसरात एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या एका पोलिसांच्या ‘एस्कॉर्ट’ (सुरक्षा ताफ्यातील) गाडीला अचानक भीषण आग लागली. अत्यंत व्हीआयपी आणि कडक सुरक्षेच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अचानक गाडीने घेतला पेट मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी येथील बंगल्यासमोर ही पोलिसांची एस्कॉर्ट गाडी उभी होती. यावेळी गाडीतून अचानक धूर येऊ लागला आणि क्षणाधार्त गाडीने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा मोठ्या असल्याने आजूबाजूच्या परिसरात काही काळ धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाव घेतली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे अधिकृत वृत्त अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अस्पष्ट, तपास सुरू या एस्कॉर्ट गाडीला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत असून, अधिक माहितीची प्रतीक्षा केली जात आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या निवासस्थानाबाहेरच हा प्रकार घडल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे.
————– हेही वाचा.. दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह: दिवाळी स्पेशलमध्ये ‘ज्ञानदीप’:विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप उजळवणाऱ्या ध्येयवेड्या शिक्षकांचा अफाट प्रवास; उद्यापासून फक्त दिव्य मराठी डिजिटलच्या नव्या कोऱ्या सीरिजमधून…!
दिवाळी म्हटलं की घराघरांत उजळणारे दिवे, रोषणाई आणि आनंदाचं वातावरण… हा सण केवळ घरांमध्ये प्रकाश पसरवण्याचा नाही, तर आयुष्यातील अंधकार दूर करून नव्या आशेचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण करण्याचाही संदेश देतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असाच ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचं काम शिक्षक करत असतात. केवळ अभ्यासक्रम शिकवण्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवणारे, त्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देणारे शिक्षक समाजाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देतात. अशाच प्रयोगशील आणि ध्येयवेड्या शिक्षकांच्या कार्याचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने दिव्य मराठी ‘ज्ञानदीप’ ही विशेष मालिका घेऊन येत आहे. सविस्तर वाचा
Source link