Headlines

दर 15 दिवसांनी अधिकारी जाणार चिमुकल्यांच्या घरी:कुपोषण मुक्तीसाठी 273 बालकांच्या घरी जात तपासून अधिकारी करणार उपाययोजना




‘एक बालक, एक अधिकारी’ ही जबाबदारी आधीच निश्चित असलेल्या ‘सेवा संकल्प’ उपक्रमात जिल्हा परिषदेने आता पुढचे पाऊल टाकले आहे. जिल्ह्यातील २७३ अति तीव्र कुपोषित (सॅम) बालकांच्या कुपोषणमुक्तीची प्रगती संबंधित अधिकाऱ्यांना दर पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष घरी जाऊन तपासावी लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी तसे निर्देश दिले असून, याबाबतचे स्वतंत्र आदेश जारी केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून समजली. अधिकारी बालकांच्या कुटुंबांशी थेट संवाद साधून आरोग्य व पोषणविषयक गरजांकडे लक्ष देतील, अशी संकल्पना प्रशासनाने मांडली. त्यानुसार १६ ऑक्टोबरला अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील २७३ कुपोषीत बालकांच्या घरी भेटी दिल्या. मुलांच्या कुपोषणाची कारणे व आहाराबाबत विशेष खबरदारी काय घेता येईल, याबाबत बालकल्याण विभाग व वैद्यकीय सल्ला घेत आहेत. त्यानंतर अधिकारी फोनद्वारे याबाबत अंगणवाडी यंत्रणेशी संपर्क साधून प्रकृतीबाबत माहिती घेत आहेत. पण एवढ्यावरच न थांबता, आता दर पंधरा दिवसांनी संबंधित मुलांना प्रत्यक्ष भेट देणे अनिवार्य असल्याचे सीईओ भंडारी यांनी निर्देश दिले आहेत. यापूर्वी अधिकाऱ्यांनी भेटी घेऊन, मुलांना पोषक आहार दिला आहे. तसेच वजन वाढवण्यासंदर्भात आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. आता, जर काही मुले आजाराने त्रस्त असतील, त्यासाठी त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवले जाईल. या मुलांना कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्व नेमलेले २७३ अधिकारी प्रयत्न करतील, असे भंडारी यांनी, ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. कुपोषणातील सॅम व मॅम म्हणजे काय ? . उंचीच्या तुलनेत वजन ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमाणित वाढ-तक्त्यानुसार उणे ३ एसडीपेक्षा कमी. ६ ते ५९ महिन्यांच्या बालकाच्या दंडाचा मधला घेर ११.५ सेंमीपेक्षा कमी. दोन्ही पायांवर खळगा पडणारी सूज असेल तर तीव्र कुपोषीत मानले जाते. . मॅम प्रकार म्हणजे बालक मध्यम कुपोषीत मानले जाते. त्यात उंचीच्या तुलनेत वजन उणे ३ एसडी ते उणे २ एसडी या दरम्यान असावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *