![]()
येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत संजयमामा शिंदे यांनी पुणे शूटिंग स्पोर्ट््स असोसिएशन आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्या विद्यमाने आयोजित ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२६ (शॉटगन) मध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले. सदर स्पर्धा दि. ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई उपनगर जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित, उपाध्यक्ष रमेश कुसळे आणि जनरल सेक्रेटरी शीला कानुंनगो, तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला.राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत असतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद मानले जात आहे. या यशाबद्दल यशवंत शिंदे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कुर्डुवाडी परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी क्रीडा क्षेत्रातील आवड जोपासत मिळवलेले यश तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Source link
राज्य नेमबाजी स्पर्धेत निमगावच्या शिंदे यांनी मिळवले सुवर्ण ‘यश’:पुण्यामध्ये 41 व्या राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत बाजी