Headlines

बांधिलकी:राष्ट्रवादी, मराठा सेवा संघाचा ‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रम; कास्तकार, कामगारांच्या पाल्यांना किट वाटप




गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याच्या सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम गुरुवारी (दि. ५) उत्साहात पार पडला. मराठा सेवा संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. रणजित कोरडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युवा नेते आमदार रोहित पवार उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “मानवीय सेवा कार्य करताना निरपेक्ष मनाची आवश्यकता असते. पैशांपेक्षा मन किती मोठे आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा उपक्रम आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कास्तकारांची अवस्था पाहता अशा सामाजिक उपक्रमांची समाजाला नितांत आवश्यकता आहे.” कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालिका सोयरा अंधारे हिने जिजाऊ वंदना सादर केली. मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचेही विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष पंकज जायले, काँग्रेस नेते अशोक अमानकर, डॉ. पुरुषोत्तम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रफीक सिद्दिकी, प्रदेश संघटक सचिव जावेद जकारिया, युवक अध्यक्ष देवानंद राऊत, ॲड. अनंत खेडकर, डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. दीपक मोरे, डॉ. संदीप चव्हाण यांच्यासह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. प्रदीप चोरे यांनी केले. संचालन धनंजय मिश्रा यांनी केले. आभार संदीप निर्मळ यांनी मानले. या कार्यक्रमास अविनाश पाटील, अशोक पटोकार, श्रीकांत बिहाडे, डॉ. संदीप चव्हाण, देवा गावंडे, अतुल अंधारे, पंकज साबळे, देवराव हागे पाटील, दिवाकर पाटील, मधुसूदन गावंडे, सुधाकर रोडे, जयदीप सोनखासकर, अवि गावंडे, डॉ. सुभाष भडांगे, किशोर हिंगणे, शामराव टापरे, मारुती शेळके, सचिन कावरे, राजेश वाहूरवाघ, राज जायले, गोपी चाकर, वैभव ठोसर, दिलीप देशमुख, विनोद साबळे, अॅड. नमन आंबेकर, चेतन सोळंके, ऋषभ काळे, रेणू गावंडे, इंदू देशमुख, अंजली ठाकरे, डॉ. वंदना मोरे, डॉ. सीमा तायडे, अंजली ठाकरे, आशा अंधारे, रुंदाताई खराटे यांच्यासह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते. जावेद जकारिया यांच्या संकल्पनेचे कौतुक सणासुदीच्या काळात शेतकरी व मजुरांच्या मुलांनाही दिवाळीचा खराखुरा आनंद घेता यावा, या उदात्त हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव जावेद जकारिया यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली व पुढाकार घेतला. माणुसकी, सामाजिक एकोपा, गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी ही संकल्पना अकोल्यातील सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी जकारिया यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *