Headlines

ऊसदराचा तिढा सुटला!:कोल्हापुरात 3900+100+200 चा फॉर्म्युला ठरला; सांगली, साताऱ्यात तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा शेट्टींचा इशारा




तिन दिवसांपासून ऊसाच्या पहिल्या हप्त्यावरून कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तापलेले राजकीय आणि सामाजिक वातावरण अखेर शांत झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाला प्रति टन ४५०० रुपये पहिल्या हप्त्याची मागणी करत पुणे-बंगळुरू महामार्गावर पुकारलेले ‘चक्काजाम आंदोलन’ अखेर स्थगित करण्यात आले आहे. कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात ४२०० रुपयांच्या हप्त्यावर तडजोड झाली असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आपणच एक पाऊल मागे घेतल्याचे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. असा ठरला पैशांचा फॉर्म्युला या तडजोडीबाबत माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले, “सुरुवातीला कारखानदारांचा ३८००+२०० असा प्रस्ताव होता. मात्र, आम्ही ४५०० रुपयांच्या मागणीवरून थोडे मागे येत ४२०० रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता. पैशांच्या उपलब्धतेनुसार आता ३९०० रुपये लगेच, १०० रुपये सीझन संपताना आणि २०० रुपये पुढचा सीझन सुरू होण्यापूर्वी, अशा पद्धतीने ४२०० रुपयांचा फॉर्म्युला कारखानदारांनी मान्य केला आहे.” साखरेचे दर वाढल्यास अतिरिक्त नफ्यातील वाटा हा तोडगा साखरेचे दर ४५०० रुपये प्रति क्विंटल गृहीत धरून काढण्यात आला आहे. जर साखरेचे दर यापेक्षा जास्त वाढले, तर त्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्यामध्ये ७० टक्के वाटा शेतकऱ्याचा आणि ३० टक्के वाटा कारखान्याचा असेल, असा अत्यंत महत्त्वाचा निर्णयही या बैठकीत झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले. ‘दिवाळीला प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही’ एकरकमी रक्कम न मिळता ती तीन टप्प्यांत का स्वीकारली? या प्रश्नावर बोलताना शेट्टी म्हणाले, “खरं तर आम्हाला हे तीन टप्पे नको होते. आमची ४०००+२०० ची मागणी होती. पण, मधल्या काळात जे १०० रुपये थोडे उशिरा मिळणार आहेत, त्या एका मुद्द्यासाठी रस्त्यावर अडलेल्या हजारो लोकांना, सण साजरा करणाऱ्या पोलिसांना आणि गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे आम्हीच मनाचा मोठेपणा दाखवून या तडजोडीला मान्यता दिली.” सांगली, साताऱ्यासाठी नवा इशारा कोल्हापुरातील आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी राजू शेट्टी यांनी सरकारला आणि प्रशासनाला इशारा दिला आहे. “कोल्हापूरचाच हा पॅटर्न सांगली आणि साताऱ्यातही राबवावा, असे बैठकीत ठरले आहे. त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी करावी. अन्यथा, आम्हाला त्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्रपणे आंदोलन उभे करावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनातील फोटो.. —————— हेही वाचा.. महाराष्ट्रातील अनोख्या दिवाळी परंपरा:कुठे वाघदेवाची पूजा, कुठे मेंढ्यांचा शृंगार; तर कुठे अंगणात उभे राहतात शिवरायांचे गड-किल्ले

दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते आकाशकंदील, पणत्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज, फराळाचा सुगंध आणि लक्ष्मीपूजनाचा उत्साह. मात्र, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिवाळीचे आणखीही काही वेगळे रंग पाहायला मिळतात. कुठे आदिवासी बांधव वाघदेवाची पूजा करून पशुधनाच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात, कुठे नरकासुराच्या प्रतिकृतीचे दहन केले जाते. कुठे शेतकरी बळीराजाला साकडे घालतात, तर कुठे धनगर बांधव आपल्या मेंढरांनाच लक्ष्मी मानून त्यांची पूजा करतात. एवढंच नाही, तर दिवाळीत मुलांच्या हातून साकारले जाणारे मातीचे गड-किल्ले महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतात. जाणून घेऊया महाराष्ट्राच्या दिवाळीतील अशाच पाच अनोख्या आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या परंपरा… सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *