![]()
येथील जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयामार्फत विलासनगर परिसरातील अभिजीत रवींद्र बोधनकर (रा. रमाबाई नगर, विलास नगर, अमरावती) यांच्या घरी आज, गुरुवार, ५ नोव्हेंबरला तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान तब्बल ६५ संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. डीडीआर कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने सकाळी ११.१० वाजता सुरू केलेली झडतीची व तपासणीची कारवाई दुपारी ३.३० वाजेपर्यंत चालली. उपनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पथक गठित केले आणि पुढे गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विलास नगर परिसरात बेकायदा/अवैध सावकारीविरोधात ही धडक कारवाई केली. पथकप्रमुख मनोज रोहनकर (सहकारी अधिकारी श्रेणी एक) यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. सदर तपासणी पथकात विजय अंबाडेकर, श्रीमती एस. आर. हांडे व भाग्येश पुसदेकर या अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्याचवेळी पंच म्हणून अजिंक्य ठाकरे व उमेश काळे यांची मदत घेण्यात आली. तपासणीदरम्यान कोणताही अडथळा येऊ नये म्हणून गाडगेनगर पोलfस स्टेशनचे कर्मचारी निलेश अंबुलकर ,सुनैना कांबळे यांनी सहकार्य केले. कारवाईदरम्यान काय सापडले ? तपासणीदरम्यान २४ कोरे स्टॅम्पपेपर, स्थावर मालमत्तेचे खरेदीखत, कोरे व सही केलेले चेक (धनादेश) नोंदवह्या आणि इतर कागदपत्रे आढळून आली. अशाप्रकारे एकूण ६५ दस्तऐवज जप्त करण्यात आले.
Source link
अवैध सावकारीविरुद्ध कारवाई; कागदपत्रे जप्त