Headlines

सोन्यासह हिरे, प्लॅटिनम, लाइटवेट दागिन्यांना ग्राहकांची अधिक पसंती:सोने- चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सराफ्यात गर्दी



सोने-चांदीचे दर काहीसे स्थिर आहेत. दर कमी असल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशीच ग्राहकांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांची बुकिंग करण्यासाठी सराफा दुकानांत मोठी गर्दी केली. बहुतेक ग्राहक धनत्रयोदशीला दागिने, शिक्के, मूर

.

अंगठी, कर्णफुले, मंगळसूत्र, कंगण, लक्ष्मीहार, चपलाकंठी, २४ कॅरेटचा शिक्का, २४ कॅरेटसह हिऱ्याच्या अंगठ्यांना मागणी आहे. नैसर्गिक हिऱ्यांच्या रेवा ब्रँडला भरपूर मागणी आहे. हिऱ्यांची अंगठी कॅरेटनुसार २५ हजारांपासून उपलब्ध आहे. चांदीचे शिक्के, मूर्ती, दागिनेही ग्राहकांनी पूर्वसंध्येलाच घरी नेले. धनत्रयोदशीला त्यांची पूजा होणार आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३३ हजार ४०० रुपये तोळा आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४४ हजार ७०० रुपये तोळा आहे. गेल्या महिन्याच्या आधी सोन्याचा दर १ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त होता. लाईट वेट दागिन्यांमध्ये फिदर लाईट दागिने महिलांच्या विशेष पसंतीस उतरले. हे दागिने १४, १८ कॅरेटमध्ये उपलब्ध आहेत. किंमत किफायतशीर आहे. कमी पैशांत चांगले डिझाईन घालण्याकडे महिलांची ओढ दिसली. विशेषत: नेकलेस, कर्णफुले खरेदी झाली. विविध सराफा दुकानांनी घडणावळीवर सूट दिली. फिदर वेट दागिने २२, २४ कॅरेट दागिन्यांपेक्षा २५ ते ३५ हजारांनी स्वस्त मिळत आहेत. हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घडणावळीवर ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत सूट आहे. त्यातही हिऱ्यांच्या अंगठीला सर्वाधिक पसंती दिली जात असून ५० हजारापासूनच्या किंमतीचे दागिने ग्राहक खरेदी करीत आहेत. ग्राहक सोन्यात तर काही प्लॅटिनममध्ये हिऱ्याला बसवून अंगठी तयार करण्यास पसंती देत आहेत.

लाइटवेट दागिन्यांना सर्वाधिक पसंती सध्या सोन्याचे दर ही काहीसे स्थिर आहेत. फिदर वेट दागिन्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. १० ग्रॅममध्ये कमी वजनाचे किफायती दागिने खरेदी करीत आहेत. प्रवीण सोनोने, व्यवस्थापक, पीएन गाडगीळ अॅण्ड सन्स.

सराफा बाजारात समाधानकारक स्थिती ^महिनाभरात सोन्या, चांदीचे दर काहीसे कमी झाल्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली असून धनत्रयोदशीला सोने खरेदी करायचेच असे ठरवणाऱ्या ग्राहकांनी बुकिंग करून ठेवले आहे.आज धनत्रयोदशीला ते दागिने घरी नेतील किंवा नव्या दागिन्यांची खरेदी करतील. बाजारातील स्थिती समाधानकारक आहे. राजेंद्र भंसाली, अध्यक्ष, अमरावती सराफा असोसिएशन.

स्वस्त, मस्त दागिने खरेदीकडे कल ^बहुतांश महिला असोत की, पुरुष ग्राहक त्यांचा स्वस्त आणि मस्त दागिने खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. बहुतांश ग्राहक अंगठी, कानातले, सोने चांदीचे शिक्के असे दागिने खरेदी करीत असून एव्हाना १४ व १८ कॅरेटचाही पर्याय उपलब्ध असल्यामुळे अशा दाण्यांवर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत. त्यामुळे सराफा बाजारा चांगलाच झळाळला आहे. नारायण साने, ग्राहक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *