Headlines

गोकुळ प्रकरणी बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर:म्हणाले- निकालानंतर सदस्य नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देणे लोकशाहीला घातक




कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने घेतलेल्या ५ तज्ज्ञ (शासकीय) सदस्यांच्या नियुक्तीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून सरकारवर आधीच चौफेर टीका सुरू केली असताना, आता महायुती सरकारला मित्रपक्षाकडूनच ‘घरचा अहेर’ मिळाला आहे. शिवेसनेचे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर थेट नाराजी व्यक्त करत, ‘असे करणार असाल तर निवडणुका घेतल्याच कशाला?’ असा सवाल उपस्थित केला आहे. ‘निकाल लागल्यानंतर असा निर्णय घेणे चुकीचे’ गोकुळ दूध संघात सतेज पाटील गटाला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना, राज्य सरकारने निवडणुकीनंतर नियम बदलून प्रशासकीय सदस्य नेमल्याच्या प्रकारावर बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत आक्षेप घेतला. ते म्हणाले, “निवडणुकीच्या पूर्वी जर दोन स्वीकृत सदस्य घेतले असते, किंवा अगोदरपासूनच त्यात एखादा सदस्य वाढवला असता तर ते मान्य करता आले असते. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण जेव्हा असा निर्णय घेतो, तो चुकीचा आहे.” ‘स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे लोकशाहीला घातक’ सर्वात मोठा आक्षेप नोंदवताना बच्चू कडू यांनी स्वीकृत सदस्यांच्या ‘मतदानाच्या अधिकारावर’ बोट ठेवले. ते म्हणाले, “आम्ही आतापर्यंत पाहत आलोय की स्वीकृत सदस्याला मतदानाचा अधिकार कुठेच नसतो. पण या प्रकरणात तुम्ही मतदानाच्या अधिकारासहित प्रशासकीय सदस्य पाठवत असाल, तर ते लोकशाहीला अत्यंत घातक आहे.” ‘उद्या सत्ता बदलली तर काय?’ सरकारला सूचक इशारा सध्याच्या सत्तेच्या गैरवापराबद्दल बोलताना कडू यांनी सरकारला भविष्यातील धोक्याची जाणीव करून दिली. “आज आपल्याकडे सत्ता आहे म्हणून आपल्याला हे सगळं बरं वाटतं. पण उद्या सत्ता बदलली आणि हीच चुकीची पद्धत जर अशीच वाढीस लागली, तर मोठे नुकसान होईल,” असा इशारा त्यांनी दिला. ‘तर मग निवडणुका घेतल्याच कशाला?’ शेवटी, या सर्व प्रशासकीय हस्तक्षेपावर उद्विग्नता व्यक्त करताना बच्चू कडू म्हणाले, “जर लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या बहुमतावर असे सदस्य लादून निर्णय फिरवायचे असतील, तर मग पर्यायाने मतदान घेतलं कशाला? हाच मोठा प्रश्न निर्माण होतोय.” ओठावर एक अन् पोटात एक नको; गोकुळच्या नावाने चिटिंग थांबवा – रवींद्र धंगेकर गोकुळ दूध संघाच्या स्वायत्ततेवर घाला घातल्याचा आरोप करत धंगेकर यांनी भाजपच्या कार्यपद्धतीची पोलखोल केली. “१९५० मध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्याला आज ७० ते ८० वर्षे झाली आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नाळ सहकाराशी घट्ट जोडलेली आहे. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या गोकुळ दूध संघात निव्वळ सत्तेसाठी इतका हस्तक्षेप करणे पूर्णपणे गैर आहे.” “ओठावर एक आणि पोटात एक असे चालणार नाही. जे पोटात आहे तेच ओठावर असले पाहिजे. निवडणुकीत जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा आदर ठेवूनच कामकाज केले पाहिजे. काहीतरी तांत्रिक त्रुटी काढून किंवा पळवाटा शोधून अध्यक्ष निवडीला विलंब लावणे आणि मागील दाराने संचालक घुसवणे ही शुद्ध लबाडी आहे.” देशाच्या निवडणुकीपेक्षा गोकुळ मोठी झाली का? “सहकारात राजकीय हस्तक्षेप नसावा, ही सर्वपक्षीय परंपरा राहिली आहे. पण आज देशाच्या निवडणुकीपेक्षा गोकुळची निवडणूक मोठी झाली आहे का, असा प्रश्न पडतो. यात असे काय दडले आहे की सत्तेसाठी एवढा अट्टाहास सुरू आहे?” असेही धंगेकर म्हणाले. —————– हेही वाचा.. गोकुळमध्ये रडीचा डाव अन् बाहेर लोकशाही वाचवा मोर्चे: सत्तेत राहून मोर्चे काढणारा भाजप अजब पक्ष, राज ठाकरेंचा घणाघात कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीतील राज्य सरकारच्या हस्तक्षेपावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत सडकून टीका केली आहे. “खालपासून वरपर्यंत सत्तेत असूनही ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चे काढणारा भाजप हा जगातील एक अजब पक्ष आहे,” असा टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी गोकुळमधील भाजपच्या ‘रडीच्या डावा’चे वाभाडे काढले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *