Headlines

Sharad Pawar Hospital Visit; Merger Buzz In Maharashtra Politics


ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असतानाच, रुग्णालयाच्या दालनातून सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यापाठोपाठ आता

.

विलीनीकरणाच्या चर्चांचा अर्थ काय?

प्रफुल्ल पटेल-सुनेत्रा पवारांची भेट का महत्त्वाची?

गुरुवारी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीचा नेमका उद्देश काय होता आणि काय खलबते झाली, याची थेट विचारपूस शरद पवारांनी पटेलांकडे केल्याची माहिती आहे.

चर्चेच्या शेवटी शरद पवार यांनी पटेल यांना ’11 तारखेनंतर भेटू’ असा सूचक निरोप दिल्याचे समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट

पटेल यांच्या भेटीनंतर आज स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीला सुनेत्रा पवार अनुपस्थित होत्या आणि त्यानंतर त्यांनी आमदारांची वेगळी बैठक बोलावली होती. त्यामुळे आता त्यांनी थेट शरद पवारांची घेतलेली भेट केवळ कौटुंबिक आहे की पक्षातल्या अंतर्गत संघर्षातून मार्ग काढण्यासाठी, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा का मिळाली?

1 नोव्हेंबरच्या दिल्ली दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अंतर्गत नाराजी आणि विसंवाद असल्याचे उघड झाले होते. संघटना कमकुवत होत असल्याची चिंता आमदारांनी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा वारंवार रंगल्या होत्या. आता पक्षातील बडे नेते आणि स्वतः सुनेत्रा पवार शरद पवारांच्या थेट संपर्कात आल्यामुळे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या किंवा समन्वयाने काम करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा कयास लावला जात आहे.

दिल्लीतील फोन कॉल्स आणि मविआची सावध भूमिका

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला. यापूर्वीही पुण्यात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी फोन करून आस्थेने चौकशी केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पवारांशी फोनवरून संवाद साधला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनीही ब्रीच कँडीत धाव घेतली.

संजय राऊतांचा ठाम दावा

विलीनीकरण किंवा एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळताना संजय राऊत म्हणाले, “पवार साहेबांसोबत आमची सविस्तर राजकीय चर्चा झाली आहे. मोदी कहीं नहीं जायेंगे या घोषणेसारखे आमचे पवार साहेब कुठेही जाणार नाहीत, ते आमच्यासोबतच राहतील. शरद पवार हे इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीसोबतच ठाम आहेत.”

संजय राऊत यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

संजय राऊत यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

रोहित पवारांचा महत्त्वाचा खुलासा

आमदार रोहित पवार यांनी या भेटींवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. “पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. तब्येत बरी नसताना पंतप्रधान मोदी किंवा विरोधी पक्षातील नेत्यांनी फोन करणे किंवा भेटणे यात कोणतेही राजकारण नाही. डॉक्टरांनी त्यांना ताण न घेण्याचा सल्ला दिला आहे.”

अजित पवार गटाला टोला

“हॉस्पिटलमध्ये भेटायला येण्यात गैर काही नाही. पण भेटीचे फोटो आणि व्हिडिओ वापरून आपल्या पक्षांतर्गत राजकारणासाठी काहीतरी वेगळे चित्र रंगवण्याचा आणि स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ते अजिबात योग्य नाही.”

शरद पवारांची प्रकृती कशी आहे? डिस्चार्ज कधी?

शरद पवार यांना कफाचा त्रास आणि थकवा जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची तब्येत पूर्णपणे स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून ते पुन्हा सिल्व्हर ओक निवासस्थानी परतणार आहेत. शरद पवारांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आणि त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे ’11 तारखेनंतर’ होणाऱ्या संभाव्य भेटीगाठींमधून महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय वळण लागते, यावरच आता संपूर्ण सत्ताकारणाची दिशा अवलंबून असणार आहे.

—————————————————————

हेही वाचा…

पवार साहेब देशाचे नेते, मोदींच्या फोनमध्ये कोणतंही राजकारण नाही:रोहित पवारांचा खुलासा, वैभव चव्हाणच्या मृत्यूवरून सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आलेला फोन आणि प्रफुल पटेल यांनी घेतलेली भेट, यावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आमदार रोहित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. या भेटींमध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट करतानाच, आजारपणातील भेटीच्या फोटोंचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.

याचवेळी, पोलिस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट उघड करणाऱ्या वैभव चव्हाण या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूवरून रोहित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत, राज्यातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेल्याचा घणाघात केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.