राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असतानाच, त्यांच्या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ख
.
“पवार साहेबांची तब्येत आता उत्तम आहे. त्यांच्याशी माझी 10 मिनिटे चर्चा झाली. 10 नोव्हेंबरनंतर ते अलिबागला एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत,” असा थेट खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण अशक्य -जयंत पाटील
शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवरून रंगणाऱ्या राजकीय समीकरणांवर जयंत पाटील यांनी परखड भाष्य केले. “दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार साहेबांनी यापूर्वीच आपली ठाम भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकत्र येण्याच्या किंवा सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होण्याच्या बातम्या केवळ निराधार अफवा आहेत.”
दिवाळीनंतर मोठ्या घडामोडी
“महाराष्ट्रात दिवाळीनंतर फार मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसतील. महाविकास आघाडीचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असून विरोधी पक्षांची ताकद आणखी वाढेल.”

गोकुळमधील निर्णय लोकशाहीचा खून
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावरील ४ शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर ताशेरे ओढताना पाटील म्हणाले, “गोकुळमध्ये सरकारने घेतलेला निर्णय लोकशाहीला मुळीच अभिप्रेत नाही. हा सत्तेचा आणि कायद्याचा थेट गैरवापर आहे.”
ब्रीच कँडीत नेत्यांची मांदियाळी; अदानींपासून थोरातांपर्यंत दिग्गजांची हजेरी
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवारांना नियमित तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालपासून रुग्णालयात राजकीय आणि उद्योग जगतातील बड्या व्यक्तींची रीघ लागली आहे. देशातील बडे उद्योगपती गौतम अदानी यांनी आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही रुग्णालयात जाऊन पवारांशी संवाद साधला.
अजित पवार गटाचे नेतेही संपर्कात
काल अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली होती. पटेल यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार या सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी केली होती.
शरद पवारांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या असून त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. त्यांना उद्यापर्यंत (शनिवार) रुग्णालयातून अधिकृत डिस्चार्ज दिला जाण्याची दाट शक्यता आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पवार साहेब पुन्हा सक्रिय होणार असून, 10 नोव्हेंबरनंतर त्यांच्या अलिबाग दौऱ्याने राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग येणार आहे.
———————————————————-
हेही वाचा…
ब्रीच कँडीतील ‘ती’ 1 तास चर्चा: मोदींच्या फोनपाठोपाठ पटेल-सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठी; विलीनीकरणाच्या चर्चांना का आले पुन्हा उधाण? इनसाइड स्टोरी

ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असतानाच, रुग्णालयाच्या दालनातून सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यापाठोपाठ आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शरद पवारांनी पटेल यांना ’11 तारखेनंतर भेटू’ असा दिलेला निरोप आणि दुसरीकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेले फोन, यामुळे या आजारपणाच्या सदिच्छा भेटींमागे ‘दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची’ किंवा नव्या राजकीय समीकरणांची स्क्रिप्ट शिजत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी