महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026’ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींसाठी राज्य सरकारने अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक दिवाळी भेट जाहीर केली आहे. राज्य शासनाने
.
व्ही. राधा समितीच्या सर्व शिफारसी मान्य
विविध शासकीय विभागांकडून प्राप्त झालेली अतिरिक्त मागणीपत्रे आणि उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार पदसंख्येत ही अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे. आयोगाने जारी केलेल्या ताज्या परिपत्रकानुसार, आगामी ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026’ मध्ये आता 16,717 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
समितीच्या शिफारसींना हिरवा कंदील
पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्ही. राधा समितीने ज्या-ज्या महत्त्वाच्या शिफारसी केल्या होत्या, त्या सर्वच्या सर्व शिफारसी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केल्या आहेत. यामुळे भविष्यातील शिफारसींबाबतही विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
गट ‘क’ च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना नेमका कोणता मोठा फायदा होणार?
आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागण्यांना यश आल्यामुळे परीक्षार्थींना 3 महत्त्वाचे फायदे मिळणार आहेत. “आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा मागणी केली होती की, काही हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात, त्यामुळे निवडीचा रेशो किमान 1:100 च्या आत असावा. आता 16,717 जागा वाढल्यामुळे हा रेशो नक्कीच कमी राहणार असून त्याचा थेट फायदा मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे,” असे पाचपुते यांनी सांगितले.
वयोमर्यादेत 1 वर्षाची विशेष सूट
मधल्या काळात भरती प्रक्रिया लांबल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली होती. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून वयोमर्यादेत किमान 1 वर्षाची वाढ (शिथिलता) देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे, ज्यामुळे वय उलटून गेलेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळणार आहे. तांत्रिक गोंधळ आणि गैरप्रकार टाळण्यासाठी ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी आणि महिलांनंतर आता देवाभाऊंनी तरुणांनाही न्याय दिला -विक्रम पाचपुते
या निर्णयाचे स्वागत करताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की, “मी एमपीएससीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील तरुणांना अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. यापूर्वी राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले, माता-भगिनींच्या प्रश्नांना न्याय दिला गेला; आणि आता देवाभाऊंच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांच्या प्रश्नांनाही खऱ्या अर्थाने न्याय देण्यात आला आहे.”
————————————————————————
हेही वाचा…
कोल्हापूरनंतर आता राजू शेट्टींचा मोर्चा सोलापूरकडे!: रविवारी पंढरपुरातून ठरवणार ऊस आंदोलनाची पुढील दिशा, शेतकऱ्यांनो सावध राहा, शेट्टींचे आवाहन

कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ऊस दराच्या मुद्द्यावरून आक्रमक आंदोलन केल्यानंतर, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला असून, येथील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी ते रविवारी पंढरपूरमधून आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी