![]()
कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार संतोष आठरे यांची नियुक्ती झाली आहे. आठरे ९ नोव्हेंबरला पदभार स्वीकारतील. महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने निलंबनाचा आदेश काढण्यात आला. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशीही प्रस्तावित आहे. लोखंडे यांच्या बदलीमागे राजकीय कारण असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. जिल्ह्यातील दोन आमदारांच्या वादात त्यांचा बळी गेल्याचेही बोलले जात आहे. नेमकी कोणती अनियमितता झाली, हे विभागीय चौकशीत स्पष्ट होईल. लोखंडे यांच्या कार्यकाळात चांगली कामे झाल्याचेही काहींचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या समाधान शिबिरांमध्ये अमरावती तहसील कार्यालयातून नागरिकांना मोठ्या संख्येने दाखले देण्यात आले.
Source link
अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे निलंबित:अनियमिततेच्या आरोपांवर कारवाई; विभागीय आयुक्त कार्यालयातील संतोष आठरे 9 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार