![]()
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पाटकूल, आढेगाव, सौंदणे, सय्यद वरवडे, गोटेवाडी आणि विरवडे बुद्रुक या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आ.राजू खरे यांनी दिली आहे. या रस्त्याच्या विकासासाठी आमदार राजू खरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाटकूल, आढेगाव, सौंदणे, सय्यद वरवडे, गोटेवाडी आणि विरवडे बुद्रुक या गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधी मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होऊन शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या निधी मंजुरीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे आमदार राजू खरे यांनी आभार व्यक्त केले आहेत. मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार खरे यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिलेल्या मतदाररूपी प्रेमाला कधीच तडा जाऊ देणार नाही. विरोधकांनी आता फक्त काही काम नसल्याने टीका टिप्पणी करण्यातच धन्यता मानावी. मी मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत विकासकामांना कोट्यवधींच्या आकडेवारीत निधी मंजूर करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही. -आमदार राजू खरे, मोहोळ
Source link
मोहोळ तालुक्यातील रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी केला मंजूर:पाटकूल-आढेगाव-सौंदणे -सय्यद वरवडे-गोटेवाडीचा प्रश्न मार्गी