![]()
बार्शी हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकही इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी बार्शीच्या बाजारपेठेला प्राधान्य देतात. शहरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपकरणांना वाढती पसंती दिसतेय. मोठ्या स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही, इन्व्हर्टर एसी, वॉशिंग मशीन आणि ऊर्जा बचत करणाऱ्या उपकरणांकडे ग्राहकांचा कल आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन बदल होत आहेत. याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक्स साहित्य व उपकरणांच्या बाजारपेठेवरही होताना दिसतोय. पूर्वी केवळ टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर, पंखे यासारख्या गरजेच्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात होते. मात्र आता आधुनिक सुविधा, आकर्षक डिझाइन, कमी वीज वापर आणि स्मार्ट तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. विशेषतः एलईडी टीव्हीच्या क्षेत्रात मोठे बदल झाले असून, ग्राहकांकडून स्मार्ट टीव्ही, मोठ्या स्क्रीनचे टीव्ही आणि अत्याधुनिक चित्र व आवाजाची गुणवत्ता देणाऱ्या मॉडेल्सना पसंती दिली जात आहे. घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. यात प्रामुख्याने फ्रॉस्ट फ्री व स्मार्ट फ्रिज, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, इन्व्हर्टर एसी, मायक्रोवेव्ह व एअर फ्रायर वॉटर प्युरिफायर तसेच स्मार्ट बल्ब, वायफाय स्विच, स्मार्ट स्पीकर्स, रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर आणि मोबाइलद्वारे नियंत्रित करता येणाऱ्या उपकरणांची लोकप्रियता वाढत आहे. ^इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करताना ग्राहक आता केवळ किमतीचा विचार न करता वस्तूची गुणवत्ता, वीज बचत, वॉरंटी, सर्व्हिस सुविधा, ब्रँड आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यांचाही विचार करत आहेत. ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या पर्यायांमुळे ग्राहक विविध कंपन्यांच्या उत्पादनांच्या किमती व वैशिष्ट्यांची तुलना करून खरेदीचा निर्णय घेत आहेत. एकूणच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात पारंपरिक उपकरणांपासून स्मार्ट आणि ऊर्जा बचत करणाऱ्या उपकरणांकडे ग्राहकांचा प्रवास सुरू झाला आहे. त्या उपकरणांनाही मागणी आहे. -केदार बाबर, व्यावसायिक, बार्शी
Source link
वीज बचत, मोबाइलद्वारे नियंत्रित करता येणाऱ्या वस्तूंना पसंदी:बार्शीत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत स्मार्ट अन् अत्याधुनिक उपकरणांची क्रेझ