![]()
मोहोळ शहरासह तालुक्यातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्यासह फुले खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. नारळ, लक्ष्मीचा फोटो, कुबेरयंत्र यासह विविध पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या फळे आणि फुलांनीही बाजारपेठ गजबजली आहे. यंदाच्या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत झेंडूच्या फुलांच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, पूजेसाठी लागणाऱ्या व्यापारी वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. प्रतिनिधी | मंगळवेढा दिवाळी सण सुरू झाल्यापासून मंगळवेढा मध्ये बाजारपेठेत गर्दी झाली आहे. दुष्काळ सावट असतानाही बाजारपेठेत कपडे, खाद्यपदार्थ, फटाके खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेत चोखामेळा चौकात किराणामाल खरेदी करताना नागरिक मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून, शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजारातील मैदानावर फटाक्याचे मोठ्या प्रमाणावर स्टॉल लावले आहेत. या ठिकाणी तरुण लहान मुलांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. कापड दुकानांमध्ये नवनवीन व्हरायटी पाहून खरेदी करताना नागरिक दिसून आले. सर्वात जास्त खरेदी ही मोबाइल मोबाइलची झाल्याचे मार्केटमध्ये फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. संत दामाजी चौकात फुले विक्रेत्यांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती ,रस्त्यावर फुलांचे स्टॉल मांडून फुले विक्री जात होती. मंगळवेढ्यातील खवा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून गुलाब जामुन , पेढा, कुंदा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना नागरिकांनी गर्दी केली होती, शहरामध्ये पार्किंगची कुठेही व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची सातत्याने कोंडी होती. त्याचा त्रास आबालवृद्धांना झाला . तेजोमय दीपावली . मंगळवेढ्यातील बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप, फटाक्यांच्या स्टॉलवर बच्चे कंपनीची गर्दी ^मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी झेंडू फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. तर केळी खुंट दरात घट झाली आहे. अत्तर, कुबेरयंत्र, व्यापारीयंत्र, बताशी, हळदी-कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध, खडीसाखर, कवड्या, गोमती चक्र अशा वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तरी खरेदीस गर्दी आहे. -रामेश्वर स्वामी, व्यापारी मोहोळ
Source link
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये धूम:मंगळवेढ्यातील बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप, फटाक्यांच्या स्टॉलवर बच्चे कंपनीची गर्दी