![]()
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथील ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवात सादर केलेल्या निवेदनातील. तरुणांच्या आंदोलनांना अराजकता संबोधल्याचा आरोप झाल्यानंतर अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाने भूमिका स्पष्ट केली असली, तरी या प्रकरणावरून गुरुदेव भक्तांत नाराजी कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी स. ११ वा.पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस्थळी गुरुदेव भक्तांनी आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात केली. या वेळी आयोजित सभेत आंदोलनाची भूमिका मांडली. पुण्यतिथी महोत्सवातील श्रद्धांजलीपर निवेदनात देशातील जगातील घडामोडींचा आढावा घेताना बांगलादेशातील हिंसाचार, राज्यातील कोरडा दुष्काळ, नेपाळमधील जलप्रलय, तरुणांच्या आंदोलनांचा उल्लेख केला. होता. मात्र, आंदोलनांच्या संदर्भात ‘अराजकता’ या शब्दाचा उल्लेख झाल्यानंतर युवकांत नाराजी पसरली. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या तरुणांच्या आंदोलनाबाबत असा शब्दप्रयोग का केला, असा सवाल केला. यादरम्यान राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुदेव भक्त एकत्र येत आंदोलनात सहभागी झाले होते. त्यात माजी आमदार अमोल मिटकरी, चंद्रकांत पाटील, किशोर बळी, ज्ञानेश्वर रक्षक, प्रेमकुमार बोके, डॉ. रघुनाथ वाडेकर, प्रशांत कांबळे, रवी मानव, रुपराव वाघ, वैभव वानखडे, अंकुश वाघ, शफीक शहा भक्त उपस्थित होते. आम्ही कुठलाही गुन्हा केला नाही ^आंदोलनामुळे राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान होऊ नये ही भावना व्यक्त केली होती. परंतु निवेदनातील एक मुद्दा संदर्भापासून वेगळा करून प्रसारित केला. त्यातून तरुणांच्या भावना दुखावण्याचा, त्यांच्या आंदोलनावर बोटं ठेवण्याचा संस्थेचा हेतू नव्हता. प्रकाश वाघ, पदाधिकारी, अ.भा. श्री गुरुदेव सेवामंडळ.
Source link
राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुदेव भक्तांचा ‘आत्मक्लेश’