मुख्यमंत्री ज्या शेतकऱ्याच्या घरी फराळ करत आहे तो नेमका त्याच शेतकऱ्याच्या घरी झाला आहे की कलेक्टरांनी मागच्या दाराने डब्बे पाठवले असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर हे सर्व आम्ही अनुभवले आणि पाहिलेले आहे. तरीपण हा शेतकऱ्यांच्या घरी जात दिव
.
संजय राऊत म्हणाले की, गोकुळमध्ये सरकारला रस नसता तर त्यांनी असे बेकायदा संचालक नेमले नसते. हसन मुश्रीफ यांना फायदा व्हावा, त्यांच्या मुलांना संचालक होता यावे म्हणून राज्यपालांकडून आदेश काढण्यात आला आहे. तुम्हाला रस नसता तर लोकशाहीने दिलेला कौल तुम्ही मान्य केला असता. हसन मुश्रीफ यांचे पॅनल पराभूत झाले असून तिथे सतेज पाटलांचे पॅनल विजयी झाले आहे, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. सतेज पाटलांच्या निवडून आलेल्या दोन जागा निवडणूक आयोगावर दबाव आणून पराभूत करण्यात आल्या आहेत.

5 हजारात काय होते?
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या घरी जात दिवाळी साजरी करणार आहेत त्यांची संकल्पना चांगली आहे. राज्यात दुष्काळ असल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. मुख्यमंत्र्यांची कल्पना जरी चांगली असली तरी त्यांनी आता जाऊन पाहिले पाहिजे की त्यांनी जे 5 हजार रुपये दिले आहेत दिवाळी साजरी करण्यासाठी त्यामध्ये खरोखर दिवाळी साजी होईल का? हे त्यांना शेतकऱ्यांच्या घरी आणि बांधावर गेल्यावर कळेल. शेतकऱ्याच्या घरी दिवाळी साजरी केली म्हणून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात काही अर्थ नाही.
म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाही
संजय राऊत म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांबरोबर आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण शेतकऱ्यांच्या घरी 1 दिवसाची दिवाळी साजरी करत शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाही आणि दु:ख सुद्धा कमी होणार नाही. त्यासाठी त्यांच्या बांधावर जावे लागेल.
पण चीनची घुसखोरी थांबत नाही
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत पण त्यांच्या या दिवाळी साजरी करण्याने चीनची घुसखोरी थांबत नाही ना? त्यामुळे पुलवामा आणि पहलगाम सारखे हल्ले थांबत नाही ना. दिवाळी साजरी करण्याचा एक दिवसाचा याचा कार्यक्रम असतो पुढे काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जात दिवाळी साजरी केली यामध्ये नवीन असे काय आहे? यापूर्वीही असे वेगवेगळे उपक्रम इतर मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहेत.
हे ही वृत्त वाचा
महाराष्ट्रात रोज 8 शेतकऱ्यांची आत्महत्या, हा आकडा भयानक:नेत्यांच्या फायद्यासाठी डेटा सेंटर लादू नका, रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

एआय डेटा सेंटरमुळे ट्रम्प यांच्या पक्षाचा अमेरिकेत पराभव झाला आहे. तिथल्या लोकांनी सुद्धा या प्रकल्पाला नाकारले आहे. हा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी, लाईटचा वापर केला जातो, आणि त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी पाण्याचे नियोजन न केल्याने सर्व पाणी कर्नाटकमध्ये गेले आहे. इथे लोकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळणार नाही. ऊजणीतच पाणी राहिले नाही तर लोकांना पाणी मिळणार कुठून? असा सवाल पवारांनी केला आहे. केवळ नेत्यांना सपोर्ट करण्यासाठी एआय डेटा सेंटरचे समर्थन जर भाजपचे नेते करत असतील तर ते फार घातक आहे. सोलापूरचा एक जण डेंटा सेंटरमध्ये गुंतवणूकदार असून सर्व नेते त्यांच्या जवळ आहेत. वाचा सविस्तर