Headlines

पुण्यात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली:पत्नी आणि मेहुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल




पत्नीच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोखलेनगर भागातील जनवाडीत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेम अनिल जाधव (वय ३०, रा. पाच पांडव सोसायटी, जनवाडी जनता वसाहत) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रेवती रमेश गजमल ऊर्फ रेवती प्रेम जाधव (वय २५) आणि मेहुणी रितिका रमेश गजमल (वय ३०, रा. धर्मनगर, अरुण कदम चौक, जनवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रेम याची आई लक्ष्मी अनिल जाधव (वय ५२, रा. पाच पांडव सोसायटी, जनता वसाहत, जनवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम हा बेरोजगार होता. त्याच्यावर कर्ज होते. त्याची पत्नी आणि मेहुणी त्याला मानसिक त्रास देत होते. किरकोळ कारणावरुन त्याच्याशी वाद घालायचे. पत्नी आणि मेहुणीच्या त्रासामुळे मुलगा प्रेम याने ४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल पाटील तपास करत आहेत. स्टीलचा माल घेऊन ३० लाखांची फसवणूक कंपनीचे नाव आणि जीएसटी क्रमांक वापरून तीन साइट सुरू असल्याचे भासवत स्टीलचा माल घेतला आणि उर्वरित ३० लाख ९३ हजार २७ रुपये परत न केल्या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ९६ लाख ७४ हजार ६७७ रुपयांचा माल घेऊन त्यापैकी ६५ लाख ८१ हजार ६५० रुपये परत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी अभिजित चौगुले ( रा. शिवणे, बिर्याणी दुकानाजवळ, पुणे) आणि ओमसाई इलेक्ट्रिकल्स अथवा हर्ष एंटरप्रायझेसच्या लता सतीश इंगळे यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज रविराज सोलंकी (वय ३२, रा. फ्लॅट क्रमांक २०१, स्लॅब्सबरी पार्क, गुलटेकडी मार्केटयार्ड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ ते दि. २४ जानेवारी २०२६ या काळात हा व्यवहार झाला. उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करून फोनवर शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *