Headlines

रामदास कदमांचा सुनील तटकरेंवर निशाणा:मुलाच्या निवडणुकीत विरोधात काम केल्याचा आरोप, म्हणाले- माझ्याकडे खूप मसाला




महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेत कदम यांनी तटकरेंचा एकेरी उल्लेख करत अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. ‘तटकरे, तुझी लायकी आणि औकात आहे का माझ्यासोबत बसायची? जास्त मस्ती दाखवलीस तर तुझाही माज उतरवेन,’ असा थेट इशाराच त्यांनी दिला. तटकरे यांना आपल्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचेही कदम म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील दोन मित्रपक्षांमधील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. ‘माझ्या मुलाच्या विरोधात काम केले’ सुनील तटकरे यांच्यावर राजकीय बेईमानीचा आरोप करत रामदास कदम यांनी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. तटकरे यांनी आपला मुलगा योगेश कदम यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांची युती असतानाही गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना मदत केल्याचा दावा कदम यांनी केला. त्यामुळे तटकरे यांना आपल्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे ते म्हणाले. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख कदम यांनी यावेळी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचाही उल्लेख केला. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर कोकणातील १६ धरणांच्या कामांमध्ये ७० हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप झाले होते, असे ते म्हणाले. पोयनाड धरणाच्या कामाचा संदर्भ देत कदम यांनी तटकरेंवर निशाणा साधला. गेल्या २५ वर्षांपासून धरणाचे काम रखडल्यामुळे आपली १४ गावे पाण्यापासून वंचित राहिल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आरोप मागे घेतले’ सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित करत कदम यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर संबंधित आरोप मागे घेतले गेल्याचा दावा त्यांनी केला. ‘ही जनता आहे, सब जानती है. मला जास्त बोलायला लावू नको,’ असा इशाराही कदम यांनी दिला. स्टेजवरील खुर्चीच्या वादावरूनही संताप कार्यक्रमाच्या मंचावर झालेल्या प्रोटोकॉलच्या वादाचाही रामदास कदम यांनी उल्लेख केला. आपले भाषण संपत असताना सुनील तटकरे यांचे मेहुणे थेट आपल्या खुर्चीवर येऊन बसल्याचा आरोप त्यांनी केला. आपले जिल्हाप्रमुख खाली बसले असताना अशा प्रकारे खुर्चीवर बसणे म्हणजे सत्तेचा माज असल्याचे कदम म्हणाले. याच कारणामुळे आपण संबंधित व्यक्तीचा मंचावरच माज उतरवल्याचेही त्यांनी सांगितले. ‘माझ्याकडे खूप मसाला आहे’ सुनील तटकरे यांना पुन्हा इशारा देताना कदम म्हणाले की, त्यांनी जास्त मस्ती दाखवू नये, अन्यथा त्यांचाही माज उतरवला जाईल. ‘तुला सोडणार नाही, आपल्या औकातीत राहा, माझ्याकडे खूप मसाला आहे,’ असे म्हणत त्यांनी तटकरेंना सुनावले. रामदास कदम यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते या वादावर काय भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ———— हेही वाचा.. 5 हजार कशाला देताय? आम्हीच भीक मागून सरकारला देतो:शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात, परळीत ‘भीक मांगो’ आंदोलन
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीवरून संताप व्यक्त करत, अंधारे यांनी आज बीडच्या परळीमध्ये सरकारविरोधात ‘भीक मांगो’ आंदोलन पुकारले आहे. तसेच, ‘देवेंद्र फडणवीस हे सत्तेपेक्षा विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *