Headlines

रामदास कदम- सुनील तटकरे वादावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया:फडणवीसांना टोला, म्हणाले, सरकारला दुसरे काम काय?




राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करत रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तटकरे यांचा या प्रकरणात काही हात आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीच्या निमित्ताने भांडुप येथील भांडुपेश्वर कुंड परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईची पाहणी करण्यासाठी संजय राऊत आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेल्या वादावर तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. कदम यांनी केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्येच मतभेद असल्याचे चित्र समोर आले आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असताना या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे. रामदास कदम यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर संशय व्यक्त केल्याने या वादाला वेगळे वळण मिळाले आहे. कदम यांच्या आरोपांवर तटकरे यांनीही प्रत्युत्तर दिले असून, या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. दिवाळीवरील निर्बंधांवरून सरकारला टोला दरम्यान, दिवाळीच्या काळात फटाके वाजवण्यावर आणि ध्वनिप्रदूषणासह हवेच्या गुणवत्तेच्या मुद्द्यावरून घालण्यात आलेल्या निर्बंधांवरही संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारकडून विविध सण-उत्सवांवर निर्बंध घातले जात असल्याची टीका करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘सरकार निर्बंध घालत असतं, सरकारला दुसरं काम काय आहे? किंवा न्यायालयाला दुसरं काय काम आहे? ब्रिटिशांच्या काळातसुद्धा हिंदू सण आणि उत्सवांवर एवढे निर्बंध नव्हते,’ असे राऊत म्हणाले. सरकार कोणत्याही एका विचारधारेचे नसते, तर ते केवळ मतांसाठी काम करते, अशी टीकाही त्यांनी केली. ‘सरकार कोणतंच वादी नसतं, सरकार फक्त मतवादी असतं. मतांसाठी ते कोणतंही काम करू शकतात,’ असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. दिवाळीच्या सणात नागरिकांना फटाके फोडण्याची इच्छा असेल, तर त्यांना ते करू द्यायला हवे. दोन दिवस लोक फटाके वाजवतील. त्यामुळे एवढे निर्बंध घालण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘इतर वेळी हवा वर जाते का?’ हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून दिवाळीच्या काळातच निर्बंध का घातले जातात, असा प्रश्न राऊत यांनी केला. ‘काय तर म्हणे हवेचा थर खालावतो, मग इतर वेळी काय वर जातो का?’ असा सवाल करत त्यांनी प्रदूषणाच्या कारणावरून लावण्यात येणाऱ्या निर्बंधांवर टीका केली. दिवाळी हा नागरिकांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. अशा वेळी फटाके वाजवण्यावर निर्बंध घालण्याऐवजी नागरिकांना सण साजरा करण्याची मुभा द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. भांडुप येथील भांडुपेश्वर कुंड परिसरातील विद्युत रोषणाईची पाहणी करण्यासाठी आले असताना संजय राऊत यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली भूमिका मांडली. एकीकडे अजित पवारांच्या अपघातावरून महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे दिवाळीवरील निर्बंधांवरून राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा…. रामदास कदमांना आग्र्याला पाठवा!:सुनील तटकरेंचा पलटवार; म्हणाले- अजितदादा अपघातावरून कदमांचे आरोप तथ्यहीन, 5 हजार कोटींच्या बदनामीची नोटीस पाठवणार अजित पवार यांच्या अपघातावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणात सुनील तटकरे यांची चौकशी करण्याची मागणी रामदास कदम यांनी केली होती. तसेच माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या मृत्यूबाबतही कदम यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर आता सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत कदम यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एवढेच नव्हे, तर रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *