![]()
‘लालपरी’ म्हटले की, सर्वसामान्य प्रवाशांच्या हक्काची आणि विश्वासाची एसटी बस डोळ्यांसमोर येते. खडतर रस्ते असोत की, घाटवळणाचे मार्ग, प्रत्येक प्रवाशाला सुखरूप आणि वेळेत त्याच्या इच्छित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी एसटीचे चालक आणि वाहक प्रामाणिकपणे पार
.
दिवाळी हा आनंदाचा आणि कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण सण. या काळात प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद लुटत असतो. मात्र, प्रवाशांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविण्यासाठी एसटीचे चालक आणि वाहक सणाच्या दिवशीही कर्तव्यावर असतात. त्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचा आनंद घेता येत नाही.
गणेशपेठ डेपो, नागपूर येथील एमएच ४० सीएम ६२९२ क्रमांकाची नागपूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील एसटी बस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्तव्यावर होती.
दिवाळीच्या आनंदापासून दूर राहून प्रवाशांच्या सेवेसाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा अनपेक्षित सन्मान पाहून चालक आणि वाहक गहिवरून आले. या अनोख्या उपक्रमातून प्रहार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचे आणि कर्तव्यनिष्ठेच्या सन्मानाचे दर्शन घडविले.
यावेळी तन्मय धंधर, सूरज जवांजळकर, रोशन निमकर, यश निमकर, अक्षय निमकर, अभिजीत जावळे, ओम् शिरसागर, मनीष कान्हे, सौरभ होले, शंतनू बंबाल, अनुप शिरसागर, अजय लांजेवार, अमोल बालपांडे, पिंटू शिरसाट, माजी सरपंच सुरेंद्र भिवगडे, अंकुश गायकवाड, माजी सरपंच निलेश राऊत, कपिल उमप, हेमंत तायडे, शाहू देशमुख आणि प्रहारचे संजय देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून लालपरीच्या या शिलेदारांना दिलेला हा सन्मान खऱ्या अर्थाने कर्तव्याला सलाम ठरला.
गौरव सोहळा कौतुकास्पद दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. आता अचानक मनीध्यानी नसताना आमचा सन्मान करण्यात आला. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाला घरापासून दूर प्रवाशांची सेवा करणाऱ्या आमच्यासारख्या चालक, वाहकांना अचानक जर कोणी अशी सन्मानाच्या रुपात दिवाळीची भेट देत असेल तर गहिवरून येणारच. आमचीही कोणी दखल घेणारे आहे, हा विचार खरेच सुखावणारा आहे,अशी प्रतिक्रीया चालक वाहूर वाघ यांनी दिली.