![]()
आम्ही बारामतीला पंढरी मानतो. इथे रामदास कदम यांचे नाव घेऊन मला या पवित्र जागेचे महत्त्व कमी करायचे नाही, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या जर-तरच्या मुद्द्यावर मी काही बोलणार नाही. आम्ही जे काही आहोत, ते अजित पवार आणि शरद पवार यांच्यामुळेच आहोत. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे; माझ्यावर झालेल्या आरोपांना अजित पवारांच्या स्मृतीस्थळी उत्तर द्यायचे नाही. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट होतच असते, त्याचा वेगळा अर्थ काढून काही फायदा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे म्हणाले की, राज्याचे अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे, कारण अजित पवारांनी महाराष्ट्राला विक्रमी अर्थसंकल्प दिले आहेत. त्यांनी सलग 11 अर्थसंकल्प सादर केले आहेत. अर्थखाते आम्हालाच मिळावे, ही आमची ठाम भूमिका आहे. शरद पवारांचे निवासस्थान हे जसे देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे, तसेच अजित पवारांचे निवासस्थानही राजकीय केंद्रबिंदू राहिले आहे. विलीनीकरणावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील सुनील तटकरे म्हणाले की, विलीनीकरणाचा मुद्दा असेलच, तर त्यावर सुनेत्रा पवार निर्णय घेतील. शरद पवार हे सहा दशकांपासून देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळे तो त्यांचा निर्णय असेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार असल्यामुळे विलीकरणाबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांच घेतील; मला याबाबत काही माहिती नाही. मी दिवाळीनिमित्त माझ्या गावी होतो, त्यामुळे मला या संदर्भात कल्पना नाही. योग्य वेळी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करूनच या विषयावर बोलू. अजितदादांच्या स्मृतींसमोर तटकरे नतमस्तक सुनील तटकरे म्हणाले की, पाडव्याच्या दिवशी अजित पवार आपल्यात नसताना इथे येण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे, याचे आम्हाला प्रचंड दुःख आहे. गेली 30 वर्षे आम्ही पाडव्याला बारामतीला येतो, पण या वर्षी बारामतीमध्ये उसळलेला जनसागर आम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. बारामतीमधील पाडवा अजित पवारांशिवाय साजरा होत आहे, हे मनाला पटणे कठीण आहे. परंतु नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. आम्ही फक्त त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होण्यासाठी इथे आलो आहोत. हे ही वृत्त वाचा आरएसएसवर कायमस्वरूपी बंदी का घालू नये?:खडकी दारूगोळा चोरी प्रकरणावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा केंद्र- संघावर निशाणा
पुणे येथील खडकी दारूगोळा कारखान्यातून चोरीला गेलेले 44 हजारांहून अधिक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एका आंतरराज्यीय शस्त्र आणि दारूगोळा तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश करत ही कारवाई एसटीएफच्या मोहिमेदरम्यान करण्यात आली. या शस्त्र तस्करीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य चंदन तिवारी, अभिषेक तिवारी, ललटू कुमार आणि सरस कुमार यांच्यासह अनेक जण सामील होते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Source link
अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे:अजितदादांशिवाय बारामतीतील पाडवा मनाला चटका लावणारा, पवार-पटेलांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका- तटकरे