Headlines

दिव्यांगांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी मोर्शी येथे राज्यस्तरीय समिती गठित




दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचे लाभार्थी न ठेवता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र दिव्यांग राजकीय प्रतिनिधित्व अभियान सुरू केले आहे. ग्रामपंचायत ते महापालिका स्तरापर्यंत दिव्यांगांना नामनिर्देशनाद्वारे स्वीकृत सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय दिव्यांग समन्वय समिती गठित करून राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. अभियानाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, चंपतराव डाखोरे, सुहास काळे, बी.डी. शिंदे यांच्या उपस्थितीत नियुक्त्या जाहीर केल्या. नंदुरबारचे शिवाजी मोरे यांची राज्य जनसंपर्क समन्वयक, कल्याणचे अशोक भोईर यांची राज्य संघटन समन्वयक, तर ठाण्याचे विश्वनाथ थोरात यांची राज्य प्रसिद्धी समन्वयक म्हणून नियुक्ती झाली. नांदेडचे मनोहर यरपुरवाड यांची राज्य प्रसिद्धी व माध्यम समन्वयक, अमरावतीचे राजेंद्र देशमुख यांची राज्य प्रसिद्धी व माध्यम सहसम आरन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. जळगावचे विठ्ठल पाटील, बीडचे पठाण सरफराज मेहताब यांच्याकडे राज्य युवा समन्वयक व सहसमन्वयकपदाची जबाबदारी दिली. परभणीचे विष्णू वैरागड यांची मराठवाडा विभागीय समन्वयक, राकेश कांबळे यांची रत्नागिरी, वसंत कदम यांची हिंगोली, रोहित गुंडोरे यांची धाराशिव समन्वयक म्हणून नियुक्ती झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *