Headlines

चर्चेत राहण्यासाठी कोणत्या स्तरावर जाताय याचे भान ठेवा:मित्रपक्षांवर नकारात्मक बोलणे टाळा; त्यांने लोकांमध्ये शंका निर्माण होते- आदिती तटकरे




प्रत्येकाला वाटत असते की आपण चर्चेत राहावे; पण चर्चेत राहण्यासाठी आपण कोणत्या स्तरावर जात आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. रामदास कदम यांच्या वक्तव्याबद्दलची भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल मांडली आहे, तीच आमच्या सर्वांची भूमिका आहे. त्यामुळे रोह्यात झालेला निषेध स्वाभाविक आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. आदिती तटकरे म्हणाले की, राज्यावर दुष्काळाचे सावट असून, महायुती म्हणून आम्ही यंदाची दिवाळी शेतकरी बांधवांसोबत साजरी करत आहोत. सरकार म्हणून आम्ही विशेष पॅकेज जाहीर करत आहोत आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम सुरू आदिती तटकरे म्हणाले की, महायुतीमधील घटक पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. परंतु, काही विशिष्ट नेतेमंडळी इतर दोन्ही मित्रपक्षांवर नकारात्मक भूमिका मांडण्याचे काम करत आहेत. महायुतीत अशी भूमिका मांडू नये, असे मला एका सामान्य कार्यकर्त्या म्हणून वाटते; कारण महायुती सरकारच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम सुरू आहे. लोकांच्या मनातही शंका निर्माण होऊ शकते आदिती तटकरे म्हणाले की, महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्यामुळे मित्रपक्षातील नेता आणि कार्यकर्ता दुखावला जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर पुढे नेत असताना सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. लोकांचीही तीच अपेक्षा असते. जर आपणच नकारात्मक भूमिका मांडली, तर महायुतीबद्दल लोकांच्या मनातही शंका निर्माण होऊ शकते. तशी शंका निर्माण होऊ नये, यासाठी महायुतीच्या जबाबदार नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहनही आदिती तटकरे यांनी केले.

हे ही वृत्त वाचा

मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार, चारा उत्पादकांना 12 रुपयांचा हमीभाव:मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, गोकुळ निवडणुकीवरही दिले स्पष्टीकरण
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून दुष्काळग्रस्त भागाला मे महिन्यापर्यंत अखंडित पाणी आणि जनावरांना चारा पुरवण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. मराठवाड्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी सुरू करण्यात आलेले नदीजोड प्रकल्प येत्या सात ते आठ वर्षांत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, राज्यात पहिल्यांदाच चारा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर निश्चित करण्यात आले असून वाळलेल्या चाऱ्याला ८ रुपये आणि ओल्या चाऱ्याला १२ रुपये प्रतिकिलो दराने सरकार खरेदी करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *