Headlines

Sunetra Pawar Visits Murti Baramati; Celebrates Bhau Beej With Farmers


दिवाळी भाऊबीजेच्या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील मूर्टी येथे शेतकरी भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकरी महिलांसोबत पारंपरिक पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला. साध्या आणि घरगुती वातावरणात झाल

.

दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त केला जातो. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मूर्टी येथील शेतकरी भगिनींची भेट घेत त्यांच्यासोबत वेळ घालवला. यावेळी कोणताही औपचारिकपणा न ठेवता त्यांनी महिलांसोबत घरगुती जेवणाचा आनंद घेतला.

या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी शेतकरी महिलांशी संवाद साधत त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेतल्या. शेती करताना येणाऱ्या अडचणी, शेतीची सध्याची परिस्थिती, कुटुंबाची जबाबदारी आणि दैनंदिन जीवनातील आव्हाने याबाबत त्यांनी महिलांशी चर्चा केली. महिलांच्या अनुभवांना जाणून घेत त्यांच्या अडचणींबाबतही त्यांनी आस्थेने विचारपूस केली.

शेतकरी महिलांसोबत पिठलं-भाकरीचा आस्वाद घेत झालेली ही भेट साधेपणा आणि आपुलकीचा अनुभव देणारी ठरली. राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमधून वेळ काढत त्यांनी थेट शेतकरी भगिनींमध्ये मिसळून संवाद साधला.

हेही वाचा

जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील:राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अतिशय सूचक विधान केले आहे. “जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,” असे त्या म्हणाल्या आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.