Headlines

15 हजारांची नोकरी; बहिणीला अधिकारी बनवण्याचे स्वप्न:वडिलांचे छत्र हरवल्यानंतर 25 वर्षीय भावाचे लहान बहिणीच्या स्वप्नांना बळ




वडिलांचे छत्र हरवलेले असताना आणि कोरडवाहू शेतीतून काहीही उत्पादन हाती न आले असताना, अवघ्या २५ वर्षांच्या भावाने आपल्या धाकट्या बहिणीच्या उच्च शिक्षणाची व स्पर्धा परीक्षेची जबाबदारी समर्थपणे पेललेली दिसून येत आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने अकोल्यातील दत्ता विष्णू कराळे व त्यांची बहीण साक्षी कराळे (एमएससी मायक्रोबायोलॉजी) यांच्या संघर्षाची ही कहाणी नात्यातील अतूट विश्वास अधोरेखित करते. अकोला तालुक्यातील भौरद येथील दत्ता कराळे (वय २५, शिक्षण बीएससी) यांच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. कोरोनाकाळापासून वडिलांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबावर मोठा वैद्यकीय खर्च व आर्थिक संकट कोसळले होते. तीन बहिणींपैकी दोन मोठ्या बहिणींचे लग्न वडिलांच्या हयातीत पार पडले होते. त्यामुळे बहिणीच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेललेली दिसून येत आहे. वडिलांच्या निधनानंतर आई, लहान बहीण, आणि दत्ता असे तिघांचे कुटुंब उरले. संपूर्ण आर्थिक व कौटुंबिक जबाबदारी दत्ता यांच्या खांद्यावर आली आहे. बहिणीचे करिअर घडवणे हीच माझी खरी ओवाळणी बहिणीला चांगल्या पदावर प्रशासकीय अधिकारी बनवणे हेच दत्ता यांचे एकमेव ध्येय आहे. “बहिणीचे करिअर घडवने हीच माझ्यासाठी भाऊबीजेची खरी ओवाळणी आहे,’ या कृतज्ञ भावनेने दत्ता बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शेतीतील नापिकीमुळे नोकरीचा एकमेव आधार दत्ता कराळे यांच्या कुटुंबाकडे ४ एकर कोरडवाहू शेती आहे. मात्र, यंदा अकोला जिल्ह्यात वेळेवर पाऊस न पडल्याने आणि सिंचनाची सोय नसल्यामुळे कपाशी व सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाया गेले. शेतातून पेरणीचा खर्चही निघाला नाही. शेतीतील उत्पन्न अक्षरशः शून्य झाले. त्यामुळे अवघ्या १५ हजार रुपयांच्या खासगी नोकरीवरच दत्ता यांना आईचे पालनपोषण व बहिणीच्या स्पर्धा परीक्षेच्या शिक्षणाचा मोठा खर्च भागवावा लागत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *