![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांना केवळ ‘रुटीन चेकअप’ करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मागच्या आठवड्यातही दोनदा झाले होते दाखल गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती थोडी अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली होती. याच कारणामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीही ब्रिच कॅण्डी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्याभरात सलग दोनदा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते रुटीन चेकअपसाठी दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये थोडी चिंता निर्माण झाली होती. काळजीचे कोणतेही कारण नाही रुग्णालय आणि पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. ही एक पूर्वनियोजित आणि नियमित वैद्यकीय तपासणी आहे. त्यांचे वाढते वय आणि राजकारणातील सततची धावपळ, डॉक्टरांनी त्यांना नियमित तपासणीचा आणि आरामाचा सल्ला दिला आहे. त्यानुसारच त्यांच्यावर सध्या रुग्णालयात विविध तपासण्या केल्या जात आहेत. ———— हेही वाचा.. सोनिया म्हणाल्या- लोकांनी माझ्याबद्दल कहाण्या रचल्या: राजीव जिवंत असते तर आम्ही सामान्य आयुष्य जगलो असतो, मी फक्त मुलांवर आणि कामावर लक्ष केंद्रित केले नेहरू-गांधी घराण्यात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सोनिया गांधी या पहिल्या सदस्य आहेत, ज्यांनी आपले आत्मचरित्र स्वतः लिहिले आहे. यापूर्वी १९३६ मध्ये नेहरूंनी ‘ॲन ऑटोबायोग्राफी’ लिहिले होते आणि आता सोनिया गांधी यांनी ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक लिहिले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी दैनिक भास्करचे राष्ट्रीय राजकीय संपादक धर्मेंद्र सिंह भदौरिया यांच्याशी विशेष संवाद साधला. यामध्ये त्यांनी सांगितले की, राजीव गांधी जिवंत असते तर सोनिया सामान्य जीवन जगत असत्या. सविस्तर वाचा
Source link
शरद पवार पुन्हा ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल:रुटीन चेकअपसाठी नेले, मागच्या आठवड्यातही दोनदा झाले होते दाखल